केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 सामन्यांच्या वनडे सिरीजमधला तिसरा सामना आज रंगणार आहे.


रंगणार तिसरा सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सामना सुरु होईल. भारताने डरबन आणि सेंचुरियनमध्ये पहिला आणि दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताकडे नवा इतिहास रचण्याची संधी आहे. भारतीय टीम सीरीजमध्ये 2-0 ने पुढे आहे. केपटाउनमध्ये आज भारत लागोपाठ तिसऱ्या विजयाचा प्रयत्न करणार आहे.


नव्या रेकॉर्डची संधी


भारतीय टीम जर आजचा सामना जिंकते केपटाउनमध्ये भारताकडून 1992 पासून 5 सामन्यामध्ये तिसरा विजय असेल. भारतने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात येथे 3 पैकी 2 सामने गमावले आहेत.


काय आहे इतिहास


दक्षिण आफ्रिकामध्ये द्विपक्षीय सीरीजमध्ये याआधी भारतीय टीम याआधी दोन पेक्षा अधिक सामने नाही जिंकू शकली आहे. पाहुण्या संघाने 1992-93 मध्ये सात सामन्यांच्या सिरीजमध्ये 2-5 ने गमावली होती. 2010-11 मध्ये भारताने 2-1 ने आघाडी घेतल्यानंतर 5 सामन्यांची सिरीज 2-3 ने गमावली होती.