Border Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना शनिवारी (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमध्ये सुरू झाला. मालिकेच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण 1-1 अशा बरोबरीत असलेल्या या मालिकेत विजेत्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळणार आहे. यामुळे उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला फायदा होईल. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माला सुरवातीलाच नशिबाने साथ दिली. ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने नाणेफेक जिंकली. रोहितने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.


दुसऱ्या कसोटीत भारताचा पराभव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्थमधील मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. ऑस्ट्रेलिया संघाला 295 धावांनी पराभूत करून आश्चर्यचकित केले. खरतर घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 अशा फरकाने पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पोहोचली. त्याच्याकडून अशा उत्तम कामगिरीची कोणालाच अपेक्षा नव्हती. पण भारताने १-० अशी आघाडी घेतली. यानंतर ॲडलेडमध्ये दुसरा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत हा सामना 10 गडी राखून जिंकला. समोरच्या संघानेही मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.


हे ही वाचा: नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच


ॲडलेडमध्ये अश्विन ठरला अपयशी


या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना वगळण्यात आले आहे. दोघांच्या जागी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांना संधी देण्यात आली आहे. अश्विनला ॲडलेड कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला. पहिल्या डावात त्याला 22 आणि दुसऱ्या डावात 7 धावाच करता आल्या. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याला पहिल्या डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने एक विकेट आपल्या नावावर केली होती. अश्विन बाहेर गेला, पण सुंदर परतला नाही. या मालिकेत रवींद्र जडेजाला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली.


हे ही वाचा: Border-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम



हर्षित राणा बाहेर का झाला?


दुसऱ्या बदलाबाबत बोलायचे झाले तर हर्षित राणाला पर्थ कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्या सामन्यात त्याने छाप पाडली. हर्षितने पहिल्या डावात ३ बळी घेतले. त्याने ट्रॅव्हिस हेड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांना बाद केले होते. यानंतर दुसऱ्या डावात हर्षितने ॲलेक्स कॅरीला आपला शिकार बनवले. अशा प्रकारे त्याने सामन्यात 4 विकेट घेतल्या. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याला अशी कामगिरी करता आली नाही. त्याला या सामन्यात एकही यश मिळाले नाही. यानंतर रोहित शर्माने त्याला वगळून आकाश दीपला संघात घेतले.


 



हे ही वाचा: Video: आयपीएलचे दोन दमदार खेळाडू मैदानात भिडले, उपांत्यपूर्व सामन्यात प्रचंड गोंधळ


दोन्ही संघांचे प्लेइंग-11


ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.


भारत: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.