चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा! रोहित कर्णधार; ODI वर्ल्डकप गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाचं पुनरागमन

Team India Squad Champions Trophy 2025 :19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. 

पूजा पवार | Updated: Jan 18, 2025, 03:20 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा! रोहित कर्णधार; ODI वर्ल्डकप गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाचं पुनरागमन
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 :जवळपास 8 वर्षानंतर आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत 8 संघ सहभागी होणार असून याकरता बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेला संघ हा 6 फेब्रुवारी पासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये देखील खेळेल. 

Add Zee News as a Preferred Source

मोहम्मद शमीचं कमबॅक : 

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापत ग्रस्त असल्याने मोहम्मद शमी हा जवळपास 14  महिने टीम इंडियाचा भाग नव्हता. मात्र आता तो पूर्णपणे फिट झाला असून त्याला पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलंय. मोहम्मद शमीला 22 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी देखील टीम इंडियाचं भाग बनवण्यात आलंय. 

19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होणार चॅम्पियन्स ट्रॉफी : 

2017 नंतर आयसीसी यंदा प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत असून ही स्पर्धा हायब्रीड मॉडेल पद्धतीने खेळवली जाईल. पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमानपद असून दुबईत भारताचे सर्व सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळवली जाणार असून 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाईल. तर भारताचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध खेळवला जाईल. भारताचा शेवटचा लीग सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध होईल.

दोन ग्रुपमध्ये विभागले गेले 8 संघ : 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार असून ग्रुप ए मध्ये भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये अफगानिस्तान, इंग्लंड , दक्षिण अफ्रीका आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने खेळवले जातील. 

टीम इंडियाचे ग्रुप स्टेज सामने कधी? 

20 फेब्रुवारी : गुरुवार - भारत विरुद्ध बांगलादेश 
23 फेब्रुवारी :  रविवार - भारत विरुद्ध पाकिस्तान 
2 मार्च  :  रविवार - भारत विरुद्ध न्यूझीलंड 

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा 

राखीव : हर्षित राणा 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More