T20 World Cup : `या` खेळाडूला निवडून सिलेक्टर्स पछतावले, टीम इंडियातून करणार बाहेर?
खेळाडूचा खराब परफॉर्मन्स पडणार का भारी
मुंबई : टी 20 वर्ल्ड कपची सुरूवात 17 ऑक्टोबर रोजी UAE मध्ये होणार आहे. जिथे आता IPL 2021 टूर्नामेंट खेळली जात आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूची टी 20 वर्ल्ड कपच्या अगोदरच पोल खोल झाली आहे. खराब प्रदर्शन असूनही सिलेक्टर्सने या खेळाडूला टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी दिली. यामुळे खूप प्रश्न उपस्थित राहिले.
IPL 2021 मध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)याचं खूप खराब प्रदर्शन होतं. IPL सिझनमध्ये भुवनेश्वर कुमारने 9 सामन्यांत फक्त 5 विकेटच घेतले आहेत. गुरूवारी चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध IPL मॅचमध्ये भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने खराब प्रदर्शन केलं होतं. भुवनेश्वर कुमार IPL मध्ये सनराइजर्स हैदराबादकरता खेळताना दिसला.
वर्ल्ड कप अगोदरच या भारतीय खेळाडूची पोल खोल झाली
भुवनेश्वर कुमारने या सामन्यात 4 ओव्हरच्या गोलंदाजी दरम्यान 34 रन दिले. महत्वाचं म्हणजे या सामन्या दरम्यान त्याने एकही विकेट घेतली नाही. भुवनेश्वरच्या गोलंदाजीने कोणत्याही फलंदाजाला कोणतातही फरक पडत नाही. आता भुवनेश्वरच्या खराब प्रदर्शनामुळे अनेक प्रश्न उभे केले जात आहेत. सिलेक्टर्सने या गोलंदाजाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी देऊन रिस्क घेतली आहे.
सिराज आणि नटराजन सारखे बेस्ट बॉलर लाइनमध्ये
भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह सारख्या वेगवान गोलंदाजांची टी -20 विश्वचषकात निवड झाली आहे. भुवनेश्वर कुमारची कामगिरी पाहता त्याला टी -20 विश्वचषक संघात स्थान मिळत नाही. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीमध्ये ना वेग आहे आणि ना तो गोलंदाजीने विरोधी फलंदाजांमध्ये भीती निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत टी -20 विश्वचषकाच्या संघात मोहम्मद सिराज आणि टी नटराजनसारख्या मजबूत गोलंदाजांची निवड न करता सिलेक्टर्सने मोठी चूक केली आहे.
भारतासाठी चितेंची बाब
भुवनेश्वर कुमारचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. ऑक्टोबरमध्ये टी -20 विश्वचषक खेळला जाणार असल्याने भुवनेश्वर कुमारची खराब कामगिरी टीम इंडियासाठी हानिकारक ठरू शकते. भुवनेश्वर कुमार टीम इंडियासाठी खलनायक म्हणून सिद्ध होऊ शकतो. यूएईमध्ये होणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जाते.
टी 20 वर्ल्ड कप करता भारतीय टीम
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा (उप कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
स्टँडबाय: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.