IPL 2025 पूर्वी गुजरात टायटन्समध्ये खळबळ, टीमचा मालक बदलला, BCCI ने दिला हिरवा कंदील

IPL 2025 : अहमदाबाद येथील टॉरेंट ग्रुपने सोमवारी आयपीएल 2025 ची सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्स फ्रेंचायझी संघामध्ये 67 टक्के हिस्सा खरेदी केल्याची माहिती दिली. 

पुजा पवार | Updated: Mar 18, 2025, 12:24 PM IST
IPL 2025 पूर्वी गुजरात टायटन्समध्ये खळबळ, टीमचा मालक बदलला, BCCI ने दिला हिरवा कंदील
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : 22 मार्च पासून इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार आहे. मात्र यापूर्वी आयपीएलमधील (IPL 2025) प्रसिद्ध संघ गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) मोठा बदल करण्यात आलेला आहे. अहमदाबाद येथील टॉरेंट ग्रुपने सोमवारी आयपीएल 2025 ची सुरुवात होण्यापूर्वी गुजरात टायटन्स फ्रेंचायझी संघामध्ये 67 टक्के हिस्सा खरेदी केल्याची माहिती दिली. 

टॉरेंट ग्रुपने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की गुजरात टायटन्स (इरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्राइवेट लिमिटेड) मध्ये टॉरेंट ग्रुपने 67 टक्के हिस्सा खरेदी केला असून याला बीसीसीआय सहित सर्व आवश्यक मजुरी मिळाली आहे. टॉरेंट ग्रुपने गुजरात टायटन्समध्ये भागीदारी इरेलिया स्पोर्ट्स इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्याकडून मिळवली आहे. जिचा सध्या खाजगी इक्विटी फंड CVC च्या मालकीचा आहे. टॉरेंट ग्रुप हा वैद्यकीय सेवा आणि ऊर्जा क्षेत्राशी निगडित काम करत आहेत. 

हेही वाचा : 'Stupid, Stupid, Stupid...' ऋषभ पंतने केली सुनील गावसकरांची नक्कल, व्हिडीओ होतोय व्हायरल

 

टॉरेंट ग्रुपने गुजरात टायटन्स फ्रेंचायझीमध्ये 67 टक्के हिस्सा खरेदी केला असल्याने आता इरेलिया स्पोर्ट्सकडे केवळ 33 टक्के हिस्सा राहील. टॉरेंट  ग्रुपने या अधिग्रहण कराराशी संबंधित आर्थिक तपशील उघड केलेले नाहीत. सीवीसी कॅपिटल पार्टनर्सने वर्ष 2021 मध्ये गुजरात टायटन्स फ्रेंचायझीला 5,600 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. या संघाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्याच वर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 

टॉरेंटने 12 फेब्रुवारी रोजी हा व्यवहार नक्की करून त्यावर हस्ताक्षर केल्याची घोषणा केली होती. टॉरेंट ग्रुप हा जगातील सर्वात मोठी टी 20 लीग आयपीएलशी जोडणार नवा कॉर्पोरेट समूह आहे. आयपीएलमध्ये सध्या 10 संघांचा सहभाग असून याची मालकी ही अधिकतर बड्या कंपन्यांकडे आहे. 

22 मार्च पासून सुरु होणार नवा सीजन : 

शनिवार 22 मार्च पासून आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. ईडन गार्डनच्या स्टेडियमवर हा सामना होणार असून संध्याकाळी 7: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर यापूर्वी नव्या सीजनच्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा पार पडेल.