T20 वर्ल्ड कपसाठी संघात दोन मोठे बदल, 'या' खेळाडूंची एंट्री

South Africa Squad T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार असून यात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.   

पूजा पवार | Updated: Jan 22, 2026, 09:06 PM IST
T20 वर्ल्ड कपसाठी संघात दोन मोठे बदल, 'या' खेळाडूंची एंट्री
Photo Credit - Social Media

South Africa Squad T20 World Cup 2026 : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 ला (T20 World Cup 2026) आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज टोनी डी जोरजी आणि ऑलराऊंडर डोनोवन फरेरा याना दुखापतीच्या कारणामुळे वर्ल्ड कप संघातून बाहेर जावं लागलं आहे. हे दोघे आता वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांची टी20 सीरिज सुद्धा खेळणार नाहीत. 

Add Zee News as a Preferred Source

भारताविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वनडे सीरिज दरम्यान टोनी डी झोर्झीच्या उजव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले की, डी जोरजीची प्रकृती ही अपेक्षेनुसार नाही आणि तो आगामी टी 20 सीरिजसाठी सुद्धा तंदुरुस्त राहणार नाही. दीर्घ पुनर्वसनाच्या गरजेमुळे त्याला 2026 च्या टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यात आले आहे.

तर ऑलराऊंडर डोनोवन फरेरा याला SA20  लीग दरम्यान गंभीर दुखापत झाली. 17  जानेवारी रोजी जोबर्ग सुपर किंग्ज विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स सामन्यादरम्यान त्याच्या डाव्या कॉलरबोनमध्ये (हंसली) फ्रॅक्चर झाले, ज्यामुळे तो टी20 मालिका आणि वर्ल्ड कप स्पर्धेतूनही बाहेर पडला. टोनी डी झोर्झी आणि डोनोव्हन फरेरा यांच्या जागी दक्षिण आफ्रिकेने टी 20 संघात रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश करण्यात आला आहे. 

हेही वाचा : टी20 वर्ल्ड कप 2026 वर बहिष्कार टाकल्याने बांगलादेशला किती आर्थिक नुकसान होणार?

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर देखील दुखापतींशी झुंजत आहे. पार्ल रॉयल्सकडून खेळताना मिलरला स्नायूंना दुखापत झाली होती, ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडलाय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये तो खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेस चाचणीच्या निकालांवर अवलंबून असेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडेन मार्करम (कर्णधार), क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), रयान रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश और एनरिक नॉर्किया. 

दक्षिण आफ्रिकेच्या ग्रुप स्टेज सामन्यांचे वेळापत्रक : 

09 फेब्रुवारी - विरुद्ध कॅनडा , अहमदाबाद
11 फेब्रुवारी - विरुद्ध अफगानिस्तान, अहमदाबाद
14 फेब्रुवारी - विरुद्ध न्यूझीलंड , अहमदाबाद
18 फेब्रुवारी - विरुद्ध यूएई, दिल्ली

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More