नवी दिल्ली : अंडर-१९ टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीमने चौथ्यांदा वर्ल्डकप मिळवला. यामध्ये महत्वाचं योगदान होतं ते म्हणजे टीममधील मनज्योत कालरा याचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनज्योत कालराने केवळ फायनलमध्ये नाही तर संपूर्ण टूर्नामेंटमध्ये आपल्या तुफानी बॅटिंगचं प्रदर्शन दाखवलं. मनज्योतची बॅटिंग शैली टीम इंडियाचा स्फोटक बॅट्समन युवराज सिंग याच्याशी मिळती-जुळती आहे. 


अंडर-१९ टीममधील याच 'सुपरहीरो' मनजोत सोबत झी मीडियाने संवाद साधला. यावेळी मनज्योतने आपल्या क्रिकेट खेळीसोबतच अनेक गोष्टींवर भाष्य केलं.


कसा होता वर्ल्ड कपचा प्रवास?


मनज्योत : अंडर-१९ वर्ल्डकप जिंकण्यापर्यंतचा प्रवास खूपच रोमांचक होता. तसेच या दरम्यान अनेक कठिण प्रसांगांचाही सामना करावा लागला. वर्ल्डकपला जाण्यापूर्वी स्टेट लेवल मॅचेस खेळायच्या होत्या. या मॅचेसमध्ये चांगली कामगिरी करायची होती त्यासोबतच वर्ल्डकपचीही तयारी सुरु होती. मी वर्ल्डकपसाठी खास प्रॅक्टीस केली आणि नेहमीच सकारात्मक राहत समस्यांचा सामना केला.


वर्ल्ड कपचा प्रवास एका शब्दात


- रोमांचक


 


राहुल द्रविडला एका शब्दात काय संबोधणार?


- लिजेंड


 


आवडती अभिनेत्री


- दिशा पटानी. (मनजोतने ऑफ द रेकॉर्ड सांगितले की, त्याला दीपिका पादुकोणही खूप आवडते आणि न्यूझीलंडमध्ये त्याने पद्मावत सिनेमाही पाहिला)


 


फिटनेससाठी काय करतो?


- एक्सरसाईज आणि ग्राऊंड ट्रेनिंग


 


आवडता सिनेमा 


- धमाल 


 


आवडता अभिनेता


- ह्रतिक रोशन 


 


आवडत खाद्य


- पनीर आणि भात


 


सीनिअर टीममधील आवडता खेळाडू 


- विराट कोहली 


 


क्रिकेटनंतर काय करायला आवडत?


- म्युझिक