दिल्ली : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेवर गेलेली इंडियाची टीम खूपच अडचणीत आली आहे. टीममधील जवळपास 6 खेळाडू कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मात्र अशा परिस्थितीत देखील टीमने आयर्लंडवर दणदणीत विजय नोंदवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आता संघ अशा टप्प्यावर जिथे प्रत्येक खेळाडू त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. यासाठीच भारतीय बोर्डाने 5 खेळाडू पाठवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्डकपसाठी बॅकअप म्हणून पाच खेळाडूंना पाठवण्याच्या तयारीत आहे. उदय सहारन, अभिषेक पोरेल, ऋषित रेड्डी, अंश गोसाई आणि पुष्पेंद्र सिंह राठोड अशी या पाच खेळाडूंची नावं आहेत.


बुधवारी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचे सहा खेळाडू उपलब्ध नव्हते. संघात कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार शेख रशीद या सामन्यात खेळले नाही. त्याच्यासह आराध्या यादव, मानव पारेख आणि सिद्धार्थ यादव यांनाही शनिवारी युगांडाविरुद्ध भारताच्या अंतिम गट-टप्प्याच्या सामन्यातून बाहेर झाले होते.


सहारन, रेड्डी, गोसाई आणि राठोड हे वर्ल्डकपपूर्वी बीसीसीआयने जाहीर केलेल्या राखीव खेळांडूंमध्ये होते. मात्र हे खेळाडू मुख्य टीमसोबत अंडर 19 वर्ल्डकपला रवाना झाले नव्हते. 


कोण आहेत हे खेळाडू?


उदय सहारन हा राजस्थानचा फलंदाज आहे ज्याने गेल्या वर्षाच्या अखेरीस दोन भारताच्या अंडर-19 संघ आणि बांगलादेश अंडर-19 यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत 102 धावा केल्या होत्या. रेड्डी हा हैदराबादचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे, ज्याने त्याच स्पर्धेत बांगलादेश अंडर-19 विरुद्ध 53 रन्समध्ये 5 बळी घेतले होते. सौराष्ट्रचा गोसाई हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. तो त्याच्या सर्वोत्तम शॉट्ससाठी ओळखला जातो.