Indian Cricket Team reached U19 World Cup: भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली. वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावा केल्या. या खेळीनंतर अफगाणिस्तानने दिलेले 311 धावांचं लक्ष्यही भारतीय संघासमोर ठेंगणं वाटू लागलं होतं. भारताने 41.1 ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं. 7 गडी राखून भारताने हा सामना जिंकत दिमाखात फायलनमध्ये प्रवेश केला आहे.
अंडर-19 वर्ल्डकपचा अंतिम सामना 6 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता.
वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. वैभवने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, वैभव त्याच्या अर्धशतकानंतर जास्त काळ टिकला नाही. त्याने 33 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या. एरॉन जॉर्ज शेवटपर्यंत टिकला आणि 104 चेंडूत 115 धावा केल्या.
A record-extending 6⃣th title in sight
India U19 will play against England U19 in the ICC Men's Under-19 Cricket World Cup 2026 final
Scorecard https://t.co/rM2IsqevMZ#U19WorldCup pic.twitter.com/hA1NyCIVPO
— BCCI (@BCCI) February 4, 2026
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 4 गडी गमावत 310 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. उस्मान सादत आणि खालिद अहमदझाई यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. दीपेश देवेंद्रनने खालिदला (31) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर उस्मान सादत आणि फैसल शिनोजादा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या.
फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. शिनोजादा यांनी 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. उजैरुल्लाह नियाझाईने 86 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय संघाकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक 2 विकेट बळी घेतले.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.