क्राईस्टचर्च : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे या दोन दुबळ्या संघांना सहज हरवले. त्यानंतर आता बांगलादेशला हरवत भारताने सेमीफायनल गाठली आहे. भारत आणि पाकिस्तानमधला हा महामुकाबला उद्या पहाटे ३ वाजता सुरू होणार आहे.


ऑस्ट्रेलियाबरोबर होणार फायनल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि पाकिस्तानमध्ये जी टीम जिंकेल ती ऑस्ट्रेलियासोबत अंडर १९ वर्ल्ड कपची फायनल खेळेल. अंडर १९ वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं अफगाणिस्तानला पराभूत केलं.


या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं पहिले बॅटिंग करून १८१ रन्स बनवले. अफगाणिस्तानचा विकेट कीपर आणि बॅट्समन इकराम अली खिलनं ११९ बॉल्समध्ये ८० रन्स केले.


तीन वेळा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमसाठी हे लक्ष्य मोठं नव्हतं. ऑस्ट्रेलियानं ७५ बॉल्स बाकी असताना मॅच जिंकली. ओपनर जॅक एडवर्ड्सनं ७२ रन्स केल्या. आयपीएल लिलावामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबनं विकत घेतलेला अफगाणिस्तानचा ऑफ स्पिनर मुजीब जदरानन ओपनर मॅक्स ब्रायंटला ४ रन्सवर आऊट करून ऑस्ट्रेलियाला धक्का दिला.


यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन जेसन सिंघा आणि जॉनथन मेरलोही लवकर आऊट झाले. पवन उप्पल आणि नॅथन मॅकस्विनीनं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५३ रन्सची नाबाद पार्टनरशीप केली.


बॅटिंगच्यावेळी अफगाणिस्तानच्या कोणत्याही बॅट्समनला मोठी पार्टनरशीप उभारता आली नाही. अली खिलनं ११९ बॉल्समध्ये ८ फोरच्या मदतीनं ८० रन्स केले. ऑस्ट्रेलियाच्या मेरलोनं १० ओव्हरमध्ये २४ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.