)
Urvil Patel Heartwarming Gesture Towards MS Dhoni : आयपीएल 2026 मध्ये सोमवारी 18 मे रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून आधी फलंदाजी केली आणि विजयासाठी सनरायजर्स हैदराबादला 181 धावांचं टार्गेट दिलं. हे टार्गेट हैदराबादने 5 विकेट राखून पूर्ण केलं. यासह हैदराबादचा संघ प्लेऑफसाठी क्वालिफाय झाला. यंदाच्या सीजनमधील चेन्नई सुपरकिंग्सचा त्यांच्या होम ग्राउंडवरील हा शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सच्या सर्व खेळाडूंनी स्टेडियममध्ये चक्कर मारून सर्व प्रेक्षकांचे आभार मानले. यावेळी यावर्षीच्या चेन्नई संघाने ग्रुप फोटोशूट सुद्धा केलं. या फोटोशूटनंतर एम एस धोनी स्वतः खुर्ची उचलून जात होता. तेव्हा उर्वील पटेलने त्याला थांबवलं आणि त्याची खुर्ची स्वतः उचलून दिग्गज खेळाडूचा सन्मान ठेवला. उर्वीलच्या या कृतीचं सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
एम एस धोनी हा दुखापतग्रस्त असल्याने त्याने अद्याप आयपीएल 2026 चा एकही सामना खेळलेला नाही. यंदाच्या सीजनमध्ये धोनी सामन्यात खेळत नसला तर तो स्टेडियममध्ये सुद्धा येत नव्हता. सामन्यादरम्यान उगाच त्याच्याकडे लक्ष वेधलं जाऊ नये आणि संघाचं खेळावरील लक्ष विचलित होऊ नये म्हणून अनेकदा तो हॉटेलवरच बसून राहायचा. मात्र यंदाच्या सीजनमधील चेन्नई सुपरकिंग्सचा होम ग्राउंडवरील हा शेवटचा सामना असल्याने एम एस धोनी संघासोबत स्टेडियममध्ये आला आणि ड्रेसिंग रूममध्ये बसून सामना पाहत होता. सामना संपल्यावर दरवर्षी चेन्नई सुपरकिंग्स होम ग्राऊंडवरील शेवटच्या सामन्यात संपूर्ण संघाचा एक फोटो काढले. ज्यात सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचाही समावेश असतो. यावर्षी सुद्धा सामना संपल्यावर चेन्नई सुपरकिंग्सने हा फोटो काढला. मात्र फोटोशूटनंतर सर्व खेळाडू त्यांच्या खुर्च्या स्वतः उचलून मैदानाबाहेर नेट होते.
Jeet (JeetN25) May 18, 2026
was going back to dugout with chair post team photoshoot and urvil patel take chair from his hand pic.twitter.com/AvkNKWXkxc
दिग्गज क्रिकेटर आणि चेन्नईचा माजी कर्णधार एम एस धोनी सुद्धा त्याची खुर्ची स्वतः उचलून मैदानाबाहेर नेट होता. चेन्नईचा युवा फलंदाज उर्वील पटेल याने हे पाहिलं आणि आदर म्हणून त्याने धोनीच्या हातून ती खुर्ची काढून घेत स्वतः मैदानाबाहेर नेली. यावेळी एका युवा खेळाडूने दिग्गज खेळाडूला दिलेला आदर पाहून सर्वांनी त्याचे कौतूक केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.