IPL करियरची सुरुवात षटकाराने... नंतर 34 धावांवर झाला बाद, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मैदानात लागला रडू; Video Viral

Vaibhav Suryavanshi Viral Video: 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने एलएसजीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर जबरदस्त षटकार मारून त्याच्या आयपीएल करियरची सुरुवात केली.   

तेजश्री गायकवाड | Updated: Apr 20, 2025, 08:29 AM IST
IPL करियरची सुरुवात षटकाराने... नंतर 34 धावांवर झाला बाद, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मैदानात लागला रडू; Video Viral
14-year-old Vaibhav Suryavanshi seemingly in tears

Vaibhav Suryavanshi Crying Video: शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) यांच्यात सामना रंगला. यावेळी दुखापतीमुळे बाहेर गेलेल्या संजू सॅमसनच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी रियान परागने स्वीकारली.  यावेळी यंदाचा सर्वात तरुण, अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला खेळायची संधी मिळाली. वैभव सूर्यवंशीला प्रभावशाली खेळाडू म्हणून संधी  वैभवने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा वैभव 10 वा खेळाडू ठरला. त्याने पदार्पणात वैभवने 20 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी केली. पण नंतर तो भर मैदानातच रडू लागला. राजस्थान रॉयल्स संघ त्यांच्या होमग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळत होता. आरआरसमोर विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य होते. 

षटकाराने केली आयपीएल कारकिर्दीची सुरुवात

वैभव सूर्यवंशीला यशस्वी जैस्वालसोबत सलामीची संधी मिळाली. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून वैभवने आपले दमदारपणे खाते उघडले. आयपीएलच्या इतिहासात भारतीय खेळाडू म्हणून, अशी कामगिरी करणारा तो 10 वा खेळाडू आहे. त्याने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) चा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला त्याच्या पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त षटकार मारला. वैभवने त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 170 होता. आरआरने त्याला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले होते. 

हे ही वाचा: पहिल्याच चेंडूवर षटकार…!14 वर्षाच्या ‘बिहारी बाबू’ ने IPL मध्ये केले सर्वात धमाकेदार पदार्पण, कोण आहे हा वैभव सूर्यवंशी?

भर मैदानात आलं रडू 

सुरुवातीला त्याच्या खेळामुळे वैभव सूर्यवंशी खूप आनंदी दिसत होता, पण नवव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एडेन मार्करामने त्याला स्टंपिंग आउट केले. अशाप्रकारे एडन मार्करामच्या गोलंदाजीवर वैभव सूर्यवंशी बाद झाला. यष्टिरक्षक ऋषभ पंतने त्याला यष्टीचीत केले. बाद झाल्यावर वैभव भावनिक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. आता त्याचा रडण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

हे ही वाचा: लिंग बदल करून आर्यनची झाली अनाया..., पण पीरियड्स येतात का? संजय बांगरच्या लेकीने स्वतःच दिले उत्तर

हे ही वाचा: कोण आहे अनाया बांगर? लिंग बदलानंतर भारतीय खेळाडूंबद्दल धक्कादायक खुलासा करणारी क्रिकेटपटू

कसा रंगला सामना? 

तर राजस्थान रॉयल्सला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने 180 धावा केल्या होत्या. स्फोटक सुरुवात असूनही, राजस्थान संघाला फक्त 178 धावा करता आल्या. संघाचा 8 सामन्यांमधील हा सहावा पराभव आहे.