Shreyas Iyer was Almost Bitten by Dog: भारतीय संघात संभाव्य पुनरागमनाच्या अवघ्या काही दिवस आधी श्रेयस अय्यर थोडक्यात बचावला आहे. 31 वर्षीय श्रेयस अय्यर ऑक्टोबरमध्ये झालेल्या दुखापतीमुळे दोन महिने संघाबाहेर होता. जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत तो पुनरागमन करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विमानतळावर एका चाहत्याच्या कुत्र्याला गोंजारण्याचा प्रयत्न करत असताना कुत्र्याने चावा घेण्याचा प्रयत्न केला.
व्हिडिओमध्ये, श्रेयस सुरुवातीला चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची भेट एका गोंडस पांढऱ्या कुत्र्यासोबत उभ्या असलेल्या चाहत्याशी झाली. श्रेयस कुत्र्याला गोंजारत असताना कुत्र्याने त्याचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. श्रेयसने यावेळी तात्काळ त्याचा हात मागे घेतला. दुसरीकडे महिलेने कुत्र्याला आवरण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, श्रेयसला काही झालं नाही आणि तो हसत तेथून निघून गेला.
Dog tried to snatch Shreyas Iyer at the airport - he got surprised
Sarpanch saab just returned fit — PLEASE protect him at all costs pic.twitter.com/TxtBRw9OlC
— Jara (@JARA_Memer) January 9, 2026
दरम्यान, श्रेयसला 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होण्याची हिरवा कंदील मिळाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, जेव्हा श्रेयसची न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय संघात निवड झाली होती, तेव्हा अधोरेखित करण्यात आलं होतं की ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या प्लीहाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर त्याची फिटनेस आणि बंगळूरमधील सेंटर ऑफ एक्सलन्सकडून (CoE) मिळणारी परवानगी यावर त्याचा सहभाग अवलंबून असेल. श्रेयसने सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये (VHT) मुंबईचं नेतृत्व केलं आहे आणि आतापर्यंत दोन सामने खेळल्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी तंदुरुस्त दिसत आहे.
श्रेयस सध्या भारताचा एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे आणि ऑक्टोबरमध्ये सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान एक उत्कृष्ट डायव्हिंग झेल घेताना त्याला प्लीहाची दुखापत झाली होती. सामन्यानंतर त्याला अंतर्गत रक्तस्रावामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये त्याला दुखापत झाल्याचं समोर आले. या दुखापतीमुळे त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागले होते.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.