Rohit Sharma Prank: रोहित शर्माचा खोडकरपणा काही थांबेना! धवल कुलकर्णीवर केला मजेदार Prank; बघा Video

Rohit Sharama Prank: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या क्रिकेट सामन्यांसोबतच त्याच्या खेळकरपणामुळे देखील चर्चेत असतो. अलीकडेच त्याने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहून तुमचं हसू आवरणार नाही.

Updated: Nov 8, 2025, 01:41 PM IST
Rohit Sharma Prank: रोहित शर्माचा खोडकरपणा काही थांबेना! धवल कुलकर्णीवर केला मजेदार Prank; बघा Video
(photo credit - Social Media)

Rohit Sharma letast Post: माजी कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे तसेच सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. गुरुवारी (7 नोव्हेंबर 2025)ला  त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरता येणार नाही. 

Add Zee News as a Preferred Source

Rohit Sharama Prank: माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या टेस्ट मॅच आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे तसेच सोशल मीडियावर बराच सक्रिय आहे. गुरुवारी (7 नोव्हेंबर 2025)ला  त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये पेनशी संबंधित एक प्रॅन्क केला आहे. व्हिडिओमध्ये, रोहित त्याच्या मित्रांसोबत अवखळ मुलाप्रमाणे मजा करताना दिसत आहे. 

या प्रॅन्कची सुरुवात तेव्हा होते जेव्हा रोहितचा एक मित्र त्याच्याकडून ऑटोग्राफ मागतो आणि त्याला पेन देतो. मित्राने त्याला पेन देताच, रोहित त्या पेनकडे काळजीपूर्वक पाहतो आणि हसत हसत म्हणतो, "हा पेन नाहीये. हे काहीतरी वेगळं आहे? मी तुला आत्ताच सांगतो. हे काय आहे थांब" रोहित पुढे म्हणतो, "मी हे कोणावर तरी वापरणार आहे. कोणीतरी खूप, खूप खास." या नंतर रोहित थेट धवल कुलकर्णीकडे जातो त्याला कळू न देता रोहित म्हणाला 'ऑटोग्राफ कर ना जरा'.  जेव्हा धवल पेन वापरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला electrifying पेनचा छोटा शॉक बसतो. तो जरा गोंधळतो आणि पुन्हा एकदा त्या पेनचा बटन दाबतो शॉक बसल्यावर तो पेन खाली फेकतो आणि रोहितसह सगळे हसू लागतात.

39  वर्षीय हा खेळाडू जिथे जोतो तिथ खेळकर मूड सोबत घेऊनच जातो. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा मैदानाबाहेरही किती मजा-मस्ती करणारा आणि आनंदी व्यक्ती आहे हे सहजच दिसते. क्रिकेटमधून ब्रेक घेत असताना, तो त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे, त्याच्या खोडसाळपणाने सर्वांना हसवत आहे. त्याच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलिकडच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माने जोरदार पुनरागमन केले होते. तो मालिकेतील अव्वल फलंदाज ठरला असून त्याने तीन सामन्यांमध्ये 202 धावा केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिडनीमध्ये त्याच्या नाबाद 121 धावांमुळे भारताला मालिकेत १-२ अशी आघाडी करता आली, पण ही सीरीझ भारतीय संघ जिंकू शकला नाही.

About the Author