Vinesh phogat cash reward: विनेश फोगट हे नाव अगदी प्रत्येक भारतीयांना माहित आहे. अलीकडेच ती पॅरिस ऑलिंपिक 2024 दरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आली. आता भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. ऑलिंपिकमधून अपात्रतेच्या वादानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर, दुसरा धक्का म्हणजे त्यापाठोपाठ तिने राजकारणात प्रवेश केला. विनेशने 2024च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवून जुलाना जागा जिंकली. अलीकडेच, हरियाणा सरकारने तिच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी तिच्यासमोर बक्षिसाचे तीन पर्याय ठेवले होते. आता विनेशने एक पर्याय निवडला आहे.
विनेश फोगटच्या मागणीवर, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उत्तर दिले होते की विनेश आता काँग्रेसची आमदार असली तरी तिला सरकारी नोकरी, भूखंड (जमीन) किंवा ४ कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा पर्याय दिला गेला. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, याला प्रतिसाद म्हणून 4 कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची निवड केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले आहे. मंगळवारी राज्य क्रीडा विभागाला पत्र देऊन त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली. विनेश आता आमदार असल्याने तिने सरकारी नोकरी निवडली नाही.
हे ही वाचा: Cricket in Olympics: 6 संघ, 90 खेळाडू... 128 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये होणार क्रिकेटचे पुनरागमन...
मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की हरियाणा मंत्रिमंडळाने राज्याच्या क्रीडा धोरणांतर्गत फोगटला ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याच्या बरोबरीचे फायदे देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या क्रीडा धोरणात तीन प्रकारचे फायदे आहेत - 4 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार, गट 'अ' अंतर्गत उत्कृष्ट खेळाडू (OSP) नोकरी आणि हरियाणा शहरी विकास प्राधिकरण (HSVP) भूखंड.
हे ही वाचा: IPL च्या दरम्यान आली वाईट बातमी! भारताच्या 'या' माजी कर्णधाराचे निधन, क्रीडा जगताला धक्का
पॅरिस ऑलिंपिकमध्ये जास्त वजनामुळे 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या सामन्यातून अपात्र ठरल्यानंतर तिला पदक विजेत्यासारखे वागवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते की, " विनेश आमची मुलगी आहे आणि तिला ऑलिंपिक रौप्यपदक विजेती म्हणून हा पुरस्कार मिळेल. हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही."
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.