`माझं दोनदा ऑपरेशन झालं तेव्हा...` विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर केला खुलासा
Vinod Kambli : विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्या आरोग्याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय.
Vinod Kambli About Sachin Tendulkar : सध्या टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी (Vinod Kambli) फार चर्चेत आला आहे. दिवंगत क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या उदघाटन सोहळ्यात विनोद कांबळी याची अवस्था पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर त्याची अशी अवस्था का झाली, त्याला कोणता आजार आहे का? अशा चर्चा रंगू लागल्या. आता विनोद कांबळीने एका मुलाखतीतून त्याच्या आरोग्याबाबत स्वतःच खुलासा केला आहे. तसेच बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोबतच्या नात्यावर सुद्धा भाष्य केलंय.
मुलाखतीत विनोद कांबळीने अवस्थेबाबत केला खुलासा :
52 वर्षांच्या कांबळीने मुलाखतीत सांगितले की तो युरीन इंफेक्शनच्या समस्येने त्रस्त आहे ज्यामुळे महिन्याभरापूर्वी त्याची तब्बेत खूपच बिघडली होती. दरम्यान त्याची पत्नी एंड्रिया, मुलगा जीसस क्रिस्टियानो आणि मुलगी जोहाना त्याला आजारातून बरं होण्यासाठी पूर्ण सहकार्य करतात आणि त्याची काळजी घेतात. कांबळीने मुलाखतीत म्हटले की, 'मी आता पूर्वीपेक्षा बरा आहे. माझी पत्नी माझी खूप काळजी घेते. ती मला ट्रीटमेंटसाठी तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. ती मला सांगत असते की, 'तुला बरं व्हायचं आहे'. मी जेव्हा चक्कर येऊन पडलो तेव्हा माझ्या मुलाने मला उचलले आणि माझी पत्नी आणि मुलगी सुद्धा या काळात माझ्या सोबत उभ्या राहिल्या. डॉक्टरांनी त्यावेळी मला हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा : 'बुद्धिबळाचा हा खेळ महाराष्ट्रात....', राज ठाकरेंची विश्वविजेत्या डी गुकेशसाठी खास पोस्ट
मित्र सचिन तेंडुलकरबाबत केला मोठा खुलासा :
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे दोघे बालपणीपासूनचे मित्र होते. मात्र 2009 दरम्यान दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नाही असं बोललं जातं होतं. एकदा कांबळीने म्हंटले होते की, जेव्हा माझ्यावर वाईट वेळ होती तेव्हा सचिनने मला मदत केली नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळीने सांगितले की, 'मी तेव्हा फ्रस्ट्रेशनमध्ये बोलून गेलो की सचिनने मला मदत केली नाही. त्यानंतर दोघांमध्ये काहीकाळ संवाद बंद होता. मात्र तस काही नव्हतं. 2013 मध्ये माझी दोन ऑपेरेशन झाली त्यावेळी सचिनने माझ्या हॉस्पिटलचा सर्व खर्च केला. तसेच माझ्या काही जवळच्या मित्रांनी देखील माझी साथ दिली'.
सचिनने मला शिकवलं... :
विनोद कांबळीने मुलाखतीत म्हटले की, 'जेव्हा माझा डाऊनफॉल सुरु होता तेव्हा सचिनने मला सांगितले की कसं खेळायचं आहे. मी 9 वेळा कमबॅक केलं. आम्ही क्रिकेटर आहोत, आम्ही जेव्हा आऊट होतो तेव्हा आम्हाला सुद्धा दुःख होतं. यातील वानखेडे स्टेडियमवर मी लागवलेलं दुहेरी शतक नेहमीच लक्षात ठेवेन. तेव्हा आचरेकर माझ्या सोबत होते आणि आमची टीम खूपच मजबूत होती. माझा प्रवास परिपूर्ण नव्हता, पण मी माझे सर्व काही दिले. माझे कुटुंब आणि सचिनसारख्या मित्रांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा नेहमी कृतज्ञ असेन'.