IPL 2025: 'CSK वर पुन्हा दोन वर्षं बंदी घाला', ऋतुराजकडून 'बॉल टॅम्परिंग'? VIDEO तुफान व्हायरल

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings ) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी बॉल टॅम्परिंगचा दावा करत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 24, 2025, 06:32 PM IST
IPL 2025: 'CSK वर पुन्हा दोन वर्षं बंदी घाला', ऋतुराजकडून 'बॉल टॅम्परिंग'? VIDEO तुफान व्हायरल

IPL 2025: चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai Super Kings) पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या वेगवान क्षेत्ररक्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रचिन रवींद्रच्या 65 धावा आणि नूर अहमदचे 4 विकेट्स चेन्नईच्या विजयातील महत्वाचे पैलू ठरले. पण याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट चेन्नईच्या विजयात महत्त्वाची ठरली. एक व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि गोलंदाज खलील अहमद दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना दोघांनी बॉल टॅम्परिंग केल्याचा दावा केला जात आहे. 

व्हिडीओत खलील अहमद गोलंदाजी करताना दिसत आहे. तो गोलंदाजीसाठी तयार असतानाच ऋतुराज गायकवाड त्याच्याकडे येतो आणि खिशातून काहीतरी देतो. व्हिडीओत ती गोष्ट काय होती हे दिसत नाही. काही वेळाने तो पुन्हा ती खिशात ठेवून निघून जातो. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक क्रिकेट चाहते चेन्नईच्या या दोन खेळाडूंनी बॉल टॅम्परिंग केल्याचा दावा करत आहेत. 

काही चाहत्यांनी अंदाज लावत नेमकं काय झालं असावं हे सांगितलं आहे. त्यांच्यानुसार दोघांनी चिंगम एकमेकाला दिलं असावं असं म्हटलं आहे. 

दरम्यान याप्रकरणी मुंबई इंडियन्स किंवा त्यांच्या कोणत्याही खेळाडूने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी बॉल टॅम्परिंग केली असावी असा फक्त काही चाहत्यांचा अंदाज आहे.