Video: चेंडू डोळ्यासमोर पकडला, उजव्या-डाव्या बाजूला फिरवला... साई सुदर्शनने नेमकं काय केलं?

Sai Sudharsan’s Intense Red-Ball Ritual: इंग्लंडविरुद्धच्या  5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात साई सुदर्शनने भारताकडून कसोटी पदार्पण केले. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jun 23, 2025, 01:25 PM IST
Video: चेंडू डोळ्यासमोर पकडला, उजव्या-डाव्या बाजूला फिरवला... साई सुदर्शनने नेमकं काय केलं?

Sai Sudarshan Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिल्या सामन्यात साई सुदर्शनने टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन याने लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर आपला पहिला टेस्ट सामना खेळला, पण वैयक्तिक पातळीवर हा सामना त्याच्यासाठी फारसा उत्तम ठरला नाही. दरम्यान आता तो आता पुढच्या सामन्याची जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्याचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

दुसऱ्या डावात चूक पुन्हा झाली, संधी गमावली

पहिल्या डावात साई सुदर्शन शून्यावर बाद झाला. दुसऱ्या डावात मात्र त्याने जबरदस्त सुरुवात केली . 30 चेंडूंमध्ये 48 धावा ठोकल्या आणि मोठ्या खेळीची आशा निर्माण केली होती. पण बेन स्टोक्सच्या चेंडूवर खराब शॉट खेळून तो बाद झाला. त्याने सहज झेल झॅक क्रॉलीकडे दिला. विशेष म्हणजे, पहिल्या डावातही त्याला स्टोक्सनेच बाद केलं होतं. दोन्ही वेळा लेग स्टंपच्या बाजूला जाणाऱ्या चेंडूंवर त्याने स्वतःची विकेट गमावली.  

चेंडू हातात, डोळ्यांपुढे आणि...

या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साई सुदर्शनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सामन्याच्या ब्रॉडकास्टर Sony Sports Network ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये साई सुदर्शन फलंदाजीस येण्यापूर्वी चेंडू हातात घेत, डोळ्यांपुढे घेऊन जात आणि त्याला दोन्ही बाजूला फिरवत काही तरी  व्हिज्युअलायझेशन करताना दिसत आहे. तो चेंडूचा मार्ग डोळ्यांनी ट्रॅक करत होता आणि काही वेळ त्याकडे पाहून मग तो चेंडू खाली ठेवत होता.

जोरदार तयारी सुरु 

त्याच व्हिडीओत साई सुदर्शन हेल्मेट घालून मैदानाच्या एका कोपऱ्यात शांतपणे काही नोट्स लिहीताना दिसतो. ही तयारी पाहून अनेकांनी त्याचं  कौतुक केलं. कॉमनवेल्थ गेम्स पदकविजेता तेजस्विन शंकर यानेही यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, “जर तुम्ही ते पाहू शकत नाही, तर ते साध्यही करू शकणार नाही. हे प्रत्येक खेळाडूसाठी एक सुंदर आणि शिकवणारी क्लिप आहे.”

 

व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? 

साई सुदर्शनने यापूर्वीही व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात सामना डोळ्यासमोर आणून, प्रतिस्पर्धीच्या हालचालींचा अभ्यास करणं.  याचा आपल्या तयारीत महत्त्वाचा वाटा असल्याचं त्याने याआधी म्हटलं होतं. आयपीएल दरम्यान त्याने सांगितलं होतं की, “मी नेट्समध्ये काही गोष्टी आधी व्हिज्युलाईझ करतो, मग त्याची कल्पना करतो आणि शेवटी ते वापरतो.”

IPL 2025 मधला ऑरेंज कॅप विजेता

आयपीएल (IPL 2025) मध्ये साई सुदर्शनने जबरदस्त कामगिरी करत 15 सामन्यांत 54.21 च्या सरासरीने 759 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राइक रेट होता 156.17 यामुळेच त्याला ऑरेंज कॅप मिळाली होती.