प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : विरार इथं राहणारे आयर्न मॅन हार्दिक पाटील यांनी मेक्सिकोत पार पडलेली 12 वी आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करत एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपली नोंद केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक यांनी एका वर्षात सहा फूल आयर्न मॅन स्पर्धा, 16 वेळा हाफ आयर्न मॅन स्पर्धा तसंच दोन आठवड्यात दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये दोन पुर्ण आयर्नमन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.


शिवाय हार्दिक वर्ल्ड मॅरेथॉन मेजर सिरीजमध्ये जगभरात सहा ठिकाणी झालेल्या स्पर्धेत भाग घेणारा एकमेव भारतीय असून त्यांनी एकुण चार रेकॉर्ड आपल्या नावावर जमा केले आहेत.


त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करून हार्दिक यांनी एक नवा विक्रम केला आहे. त्यांची चार वेळा 2019 इवेन्ट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तीन वेळा एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाली आहे.


त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण करणारे आणि विविध बुक ऑफ रेकॉर्डमध्ये 11 वेळा नोंद करणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. त्यांच्या या कामगिरीचं सर्व स्तरावरून कौतुक केलं जात आहे.. 


काय असतात आयर्न मॅन स्पर्धेतील आव्हानं ? 


फुल आयर्नमॅन ही वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशन (डब्ल्यूटीसी) द्वारे आयोजित ट्रायथलॉन रेस आहे. यात 4 किमी पोहणे, 180.2 किमी सायकल चालवणे आणि 42.2 किमी धावणे यांचा समावेश असतो. या तिन्ही शर्यती क्रमाने आणि ब्रेकशिवाय पूर्ण करायच्या असतात. 17 तासांच्या कालावधीत ही आव्हानं सर करावी लागतात.