भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्या चर्चेत आहे. त्याने अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे क्रिकेटप्रेमी आणि चाहत्या धक्क्यामध्ये आहे. पण विराट वन डे सामन्यात खेळताना दिसणार आहे. असं असताना विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनमध्ये प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात दर्शन घेताना दिसला. या दरम्यान कोहलीच्या हातात गुलाबी रंगाची एक गोष्ट दिसली. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
प्रेमानंद महाराजांशी बोलतानाचे त्यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यापैकी एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या उजव्या हाताच्या बोटावर एक काउंटर मशीन दिसते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, विराट कोहलीच्या हातात काउंटर मशीन काय करत आहे? हे काउंटर मशीन सामान्यतः वृंदावनातील सर्व भक्त त्यांच्या गुरु, देव किंवा त्यांच्या आवडत्या देवतेचे नाव जपण्यासाठी वापरतात.
तुम्ही किती वेळा देवाचे नाव घेतले आहे ते या यंत्रात मोजले जाते. साधारणपणे लोक देवाचे नाव १०८ वेळा जपतात. कारण ते शुभ मानले जाते. कधीकधी, लोकांना आठवत नाही ,की त्यांनी किती वेळा देवाचे नाव घेतले आहे, त्या वेळी हे यंत्र कामी येते. यावरून तुम्ही किती वेळा देवाचे नाव घेतले आहे हे दिसून येते. या काऊंटर मशिनमध्ये 9999 अंक आहेत. त्यामुळे तुम्ही तेवढ्यावेळा देवाचे नाव घेऊ शकता.
संभाषणादरम्यान प्रेमानंद महाराजांनी विराटला विचारले, तू आनंदी आहेस का? विराट कोहली म्हणाला हो गुरुजी. महाराज म्हणाले- देवाची कृपा कीर्ती किंवा वैभव वाढल्यामुळे होते असे मानले जात नाही, देवाची कृपा तेव्हाच मानली जाते जेव्हा आतून चिंतन होते. संत फक्त मार्ग दाखवू शकतात. नामाचा जास्त जप करण्याची गरज नाही. ते थोडेसे केले पाहिजे, पण ते खऱ्या भक्तीने केले पाहिजे.
महाराजांनी कोहली आणि अनुष्काशी बराच वेळ गप्पा मारल्या. कोहली महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होता. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. विराटने प्रेमानंद महाराजांच्या श्री राधाकेलीकुंज आश्रमात तीन तास मुक्काम केला. यापूर्वी विराट अनुष्का एवढे समाधानी आणि शांत पाहिले नव्हते अशी देखील चर्चा आहे.