RCB vs CSK मॅचनंतर धोनी आणि विराटचा ब्रोमांस, कॅमेऱ्यात कैद झाला प्रसंग, पाहा Video

IPL 2025 : आरसीबीने सीएसकेच्या होम ग्राउंड असणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर त्यांचा पराभव केला. मात्र या सामन्यानंतर एम एस धोनी आणि विराट कोहली समोरासमोर आले यावेळी त्यांचा ब्रोमांस पाहायला मिळाला. सध्या याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पूजा पवार | Updated: Mar 29, 2025, 01:48 PM IST
RCB vs CSK मॅचनंतर धोनी आणि विराटचा ब्रोमांस, कॅमेऱ्यात कैद झाला प्रसंग, पाहा Video
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये आठवा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK VS RCB) यांच्यात पार पडला. या सामन्यात आरसीबीने तब्बल 50 धावांनी  सीएसकेचा पराभव केला. यामुळे आरसीबीने पॉईंट्स टेबलमधील पहिलं स्थान अजून मजबूत केलं असून चेन्नई चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरली आहे. आरसीबीने सीएसकेच्या होम ग्राउंड असणाऱ्या चेपॉक स्टेडियमवर त्यांचा पराभव केला. मात्र या सामन्यानंतर एम एस धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) समोरासमोर आले यावेळी त्यांचा ब्रोमांस पाहायला मिळाला. सध्या याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

चेन्नई सुपरकिंग्स आयपीएलच्या इतिहासातील 17 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होम ग्राउंड चेपॉक स्टेडियमवर पराभूत झाली आहे. पण असं असलं तरी सामन्यानंतर विराट आणि धोनीमधील ब्रोमान्सने चाहत्यांचं मन जिंकलं. सामना संपल्यावर कॅमेरामॅनचं संपूर्ण लक्ष हे विराट आणि धोनीवर होतं जेव्हा दोन दिग्गज खेळाडूंनी एकमेकांची गळाभेट घेतली. महेंद्रसिंह धोनी याने सामना संपल्यावर विराट कोहली आणि त्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या. दोघांमधील हा प्रसंग सोशल मीडियावर हिट झाला आणि याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले.  

धोनीने 9 व्या क्रमांकावर येऊन केली फटकेबाजी : 

चेन्नई सुपरकिंग्सकडून आरसीबी विरुद्ध सामन्यात महेंद्र सिंह धोनी हा नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला होता. चेन्नईला जेव्हा 28 बॉलमध्ये विजयासाठी 98 धावांची आवश्यकता होती तेव्हा धोनी मैदानात आला. धोनीने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये तीन चौकार आणि दोन षटकार मारून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. धोनीने नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊन 16 बॉलमध्ये तब्बल 30 धावा केल्या. 

पाहा व्हिडीओ : 

हेही वाचा : IPL 2025 : 'अरे तू जा तिकडे... हा डेडली ग्रुप आहे'; हातात कॅमेरा घेत रोहित सराईताप्रमाणं मराठीत काय बोलला पाहाच...

आरसीबीने विजयासाठी दिलं 197 धावांचं आव्हान : 

सामन्यापूर्वी चेन्नईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 196 धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात चेन्नई अयशस्वी ठरली आणि केवळ 8 विकेट गमावून 146 धावा करू शकली. त्यामुळे आरसीबीचा 50 धावांनी विजय झाला.  

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More