अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डला मिळते कोट्यवधींची सॅलरी

एका कंपनीच्या CEOच्या सॅलरीपेक्षाही जास्त आहे अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डची सॅलरी, पॅकेज ऐकून व्हाल हैराण

Updated: Jul 15, 2021, 11:11 PM IST
अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डला मिळते कोट्यवधींची सॅलरी

मुंबई: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची सध्या वामिकामुळे सोशल मीडियावर चर्चा होतच असते. सर्वात पावरफुल सेलिब्रिटी कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अनुष्का शर्मा एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्यासोबत ती प्रोडक्शन हाऊस देखील चालवते. तर विराट सध्या टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. 

सगळ्या चाहत्यांना माहीत आहे की जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात. अनुष्का आणि विराट आपल्या बॉडीगार्डवर सर्वात जास्त पैसे खर्च करतात. तुम्हाला माहीत आहे का अनुष्का आणि विराट आपल्या बॉडीगार्डला किती पगार देतो हे ऐकून धक्का बसेल. 

विराट आणि अनुष्काचे बॉडीगार्ड कोण आहेत आणि त्यांना किती पगार आहे याची उत्सुकता तर चाहत्यांनाही आहे. अनुष्काचा बॉडीगार्ड सोनू म्हणजेच प्रकाश सिंह आहे. ते अनुष्का आणि विराटचे बॉडीगार्ड म्हणून काम करतात. विराटसोबत लग्न करण्याआधीपासून सोनू अनुष्काचा बॉडीगार्ड म्हणून काम करतात.

काही कंपन्यांच्या CEO लाही नसेल एवढा पगार? मिळालेल्या माहितीनुसार सोनूला वर्षाची सॅलरी 1.2 कोटी आहे. हा आकडा जर खरा असेल तर असं म्हणता येईल की सोनू यांचं म्हणजेच अनुष्काच्या बॉडीगार्डचं उत्पन्न एखाद्या CEOकंपनीच्या सॅलरी पॅकेजपेक्षा जास्त आहे. विराट आणि अनुष्कारासाठी सोनू एक बॉडीगार्ड नाही तर त्यापेक्षाही जास्त खास व्यक्ती आहे.

सोनू बॉडीगार्ड हा त्यांच्या कुटुंबातील एक भाग बनला आहे. दरवेर्षी त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करता. कतरिना कैफसोबत शूटिंग सुरू असताना अनुष्काने सोनू बॉडीगार्डचा बर्थडे सेटवर साजरा केला होता. याची चर्चाही तुफान झाली होती.