मित्राच्या लग्नात विराटचा डान्स, व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच नाही तर डान्समध्ये देखील धुरंधर आहे.
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच नाही तर डान्समध्ये देखील धुरंधर आहे.
विराट कोहली डान्सचा शौकीन आहे. अनेक पार्टीमध्ये तो डान्स करतांना दिसतो. डान्सच्या बाबतीत अनुष्का देखील विराटचा हात नाही पकडू शकत. विराटला सध्या क्रिकेटमधून आराम देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर भारतीय टीम श्रीलंकेंच्या दौऱ्यावर आहे.
विराट एका मित्राच्या लग्नात सहभागी झाला होता. लग्नामध्ये विराटने खूपच मस्ती केली. ऐश्वर्याच्या कजरारे गाण्यावर त्याने डान्स केला. त्याचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट सोबत शिखर धवन देखील डान्स करतांना दिसत आहे.
पाहा व्हिडिओ