Virat Kohli: 12 मे रोजी विराट कोहलीने एका भावनिक इंस्टाग्राम पोस्टमधून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या अनपेक्षित निर्णयाने लाखो चाहत्यांचे मन दुखावले. या घोषणेला आठवडा झाला तरीही अजूनही कोहलीचा हा निर्णय त्याचे चाहते पचवू शकले नाहीयेत. मात्र, कोहली पुन्हा एकदा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. यासाठी फक्त विराटाच्या होकाराची गरज आहे. सातासमुद्रापार असलेल्या या संघाच्या मालकाने विराट कोहलीला थेट ऑफर दिली आहे.
इंग्लंडमधील मिडलसेक्स काउंटी क्लबने विराटला आपल्या संघात सामील होण्यासाठी ऑफर दिली आहे. मिडलसेक्सच्या मते, विराट कोहली या पिढीतील सर्वात प्रतिष्ठित खेळाडू आहे आणि त्यांच्या संघात तो खेळेल, तर ते त्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, पृथ्वी शॉ यांच्यासह अनेक भारतीय दिग्गज काउंटी क्रिकेट खेळतात.
कोहलीचा टेस्ट करिअर 14 वर्षांचा होतं, ज्यात त्याने अनेक ऐतिहासिक विक्रम त्याने गाठले. त्याने या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक द्विशतके ठोकणारा फलंदाज असल्याचे सिद्ध केले. भारतासाठी सर्वाधिक डबल सेंचुरी करणारा फलंदाज, तसेच सचिन, गावस्कर, द्रविड यांच्यानंतर चौथा सर्वात यशस्वी टेस्ट फलंदाज म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. मात्र, 10,000 टेस्ट धावांचं स्वप्न त्याने अपूर्णच ठेवलं.
मिडलसेक्सचे संचालक कोहलीबद्दल म्हणाले, "विराट कोहली हा त्याच्या पिढीतील सर्वात प्रतिष्ठित खेळाडू आहे, त्यामुळे अर्थातच आम्हाला त्याच्याबद्दल बोलण्यात रस आहे." कोहलीची निवृत्ती हा भारतात एक मोठा मुद्दा आहे. त्यांच्या निवृत्तीबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोहलीने इन्स्टाग्राम पोस्टमध्येच निवृत्तीबद्दल भावनिक पोस्ट केली होती.
कोहलीने अजिंक्य रहाणे, पुजारा, पृथ्वी शॉ यांच्याप्रमाणे काउंटी क्रिकेटमध्ये उतरल्यास फॅन्ससाठी ही मोठी पर्वणी ठरेल. आता तो पुन्हा खेळणार का? हानिर्णय विराट कोहलीच्या हातात आहे.