मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरूची सुरुवात फार चांगली आहे. मात्र टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीला अजून सूर गवसलेला दिसत नाहीये. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात विराटला भोपळाही फोडता आला नाही. विराटच्या या खराब कामगिरीनंतर त्याने निवृत्ती घ्यावी अशी मागणी आता सोशल मीडियावर होताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ विरूद्धच्या सामन्यात बंगळूरू फलंदाजी करत असताना पटापट विकेट पडत होता. अशावेळी विराट कोहलीकडून मोठी अपेक्षा होती. मात्र कोहली पूर्णपणे फेल ठरला. या सामन्यात विराट शून्यावर बाद झाला. यानंतर सोशल मीडियावर काहींनी विराटला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.


यावेळी एका युझरने, विराट कोहलीने आता निवृत्ती घेतली पाहिजे असं म्हटलंय. या युझरचं हे ट्विट फार व्हायरल झालं आहे. यामुळे आता खराब कामगिरीनंतर विराट खरंच निवृत्ती घेणार का हा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.





दरम्यान सोशल मीडियावर अजून एका युझरने, जुना विराट कोहली कुठे आहे? त्याने पर यावं अशी पोस्ट केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने म्हटलंय की, विराट कोहलीची निवृत्ती म्हटलं की, माझ्यासमोर ब्लँक स्क्रिन उभी राहते. 




पण विराट कोहलीच्या चाहत्यांनी मात्र यावेळी त्याची बाजू उचलून धरली आहे. मला विराटवर अजूनही पूर्ण विश्वास आहे असं एका चाहत्याने म्हटलंय. तर दुसऱ्या एका चाहत्याने विराट कोहली कणखर असून तो कमबॅक करेल अशी आशा व्यक्त केली आहे.