Virat Kohli : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याच्या बॅटिंग परफॉर्मन्सने पुन्हा एकदा सर्वांना इम्प्रेस केलं. पाकिस्तान विरुद्ध ग्रुप स्टेज सामन्यात विराटने वनडेतील त्याचं 51 वं शतक ठोकून इतिहास रचला. वनडेत सर्वाधिक शतक ठोकणारा विराट हा जगातील एकमेव फलंदाज आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर विराटने टी 20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे विराट चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर वनडे फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करेल अशी चर्चा होती. मात्र विराटने या सर्व चर्चा खोट्या ठरवल्या आणि आपण अजून काही वर्ष क्रिकेटमध्ये सक्रिय राहणार असल्याचे सांगितले. आयपीएल 2025 च्या (IPL 2025) पाश्वभूमीवर विराटने पीटीआयशी बातचीत केली. यावेळी त्याने निवृत्तीनंतर काय करणार याबाबत सांगितले.
आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली पुन्हा एकदा नव्या जोमाने मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स संघाचा भाग आहे. त्याने अनेक वर्ष आरसीबीचे कर्णधारपद सुद्धा सांभाळले. मात्र आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आले नाही. यावरून अनेकदा आरसीबीला ट्रोल सुद्धा केलं जातं. गेल्यावर्षी सुद्धा आरसीबी प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाली होती, मात्र ते फायनलमध्ये पोहोचू शकले नाही. यंदा विराट आणि आरसीबी संघ पुन्हा एकदा आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याच्या मनसुब्यानेच मैदानात उतरेल.
हेही वाचा : पाकिस्तानची झाली गोची! आयपीएलनंतर 'या' क्रिकेट लीगमध्येही खेळाडूंना नो एंट्री, तब्बल 50 खेळाडू राहिले Unsold
36 वर्षांचा विराट कोहली वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरु आहे. तेव्हा विराट निवृत्तीनंतर नेमकं काय करणार असा प्रश्न त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आला. पीटीआयला दिलेल्या उत्तरात विराट म्हणाला, 'खरंतर मला सुद्धा माहित नाही की मी निवृत्तीनंतर काय करेन. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या एका सहखेळाडूला हाच प्रश्न विचारला आणि मला सारखंच उत्तर मिळालं. हो पण मला वाटतंय कि निवृत्तीनंतर मी खूप फिरेन आणि प्रवास करेन'.
Virat Kohli said I actually don't know what I will be doing post retirement, recently I asked a team-mate the same question & got the same reply - Yeah but maybe a lot of traveling. [PTI] pic.twitter.com/koXVSgKgpB
— Johns. (CricCrazyJohns) March 15, 2025
विराट कोहलीने आजतागायत 123 टेस्ट, 302 वनडे, 125 टी 20 आणि 252 आयपीएल सामने खेळले आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना विराटने एकूण 27599 धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने 8004 धावा सुद्धा केल्या आहेत. यासोबतच तो भारतीय संघाचा माजी कर्णधार सुद्धा आहे. विराटने आयपीएलमध्ये 8, वनडेत 51 , टेस्टमध्ये 30 तर टी 20 मध्ये एक शतक ठोकलं आहे.