IND VS SA : रांची येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे सीरिजमधील पहिला सामना खेळवला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी भारतीय संघाने 350 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दक्षिण आफ्रिका मैदानात आली मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण संघाला ऑल आऊट केलं आणि त्यामुळे टीम इंडियाने 17 धावांनी विजय मिळवला, परिणामी टीम इंडियाने (Team India) 1-0 ने आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने या सामन्यात 135 धावांची कामगिरी केली आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83 वं शतक ठोकलं. त्यामुळे विराट कोहली सध्या चर्चेत आहे. विराटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय यात तो युवा फलंदाज यशस्वी जयस्वालची मजा घेताना दिसतोय.
रांची स्टेडीयमच्या मैदानावर सामना सुरु होण्याच्या ठीक आधी मैदानावर एक किस्सा घडला. दोन्ही संघ राष्ट्रीय गीतासाठी मैदानात येणार होते. तेव्हा बाउंड्री लाईनवर विराट कोहली यशस्वी जयस्वालला पाहून 'तेरे नाम' चित्रपटातील गाण्यावर फॅन्स करताना दिसले.
यशस्वी जयस्वाल सध्या त्याचे केस वाढवत आहे. तेव्हा यशस्वीची हेअरस्टाईल बघून विराट कोहली त्याची मजा घेऊ लागला. विराटला यशस्वीला पाहून 'तेरे नाम' मधील सलमान खानचं प्रसिद्ध गाणं 'तुझसे मेरी लगन लगी' ची आठवण झाली आणि तो यशस्वी समोर या गाण्यावर डान्स स्टेप्स करून विराट त्याला चिडवताना दिसला. कोहलीचा हावभाव पाहून तिथे उभे असलेले इतर खेळाडू हसायला लागले आणि त्यांनी यशस्वी जयस्वालची खिल्ली उडवली. सामन्यापूर्वीच्या या विनोदी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Kohli trolling Jaiswal's hairstyle with Salman's dance in Tere naam pic.twitter.com/V9jF1PccKK
Gangadhar (90andypycroft) November 30, 2025
विराट कोहलीने कोणत्या सामन्यात शतक ठोकले?
विराट कोहलीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात शतक ठोकले.
विराट कोहलीचे शतक कितवे होते?
विराट कोहलीचे शतक आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 83वे आणि वनडे कारकिर्दीतील 52वे शतक होते.
विराट कोहलीने यशस्वी जयस्वालची मजा का घेतली?
विराट कोहलीने यशस्वी जयस्वालची मजा त्याच्या हेअरस्टाईलमुळे घेतली.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.