कोहली 4-5 दिवसांपूर्वीच तयार... अचानक घेतलेल्या निवृत्तीवर रणजी प्रशिक्षकाचा विराटबद्दल मोठा खुलासा

Virat Kohli Retirement: 12 मे रोजी विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट टाकत तो कसोटीमधून निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली. त्यावर आता त्याच्या रणजी प्रशिक्षकांची प्रतिक्रिया आली आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: May 13, 2025, 08:49 AM IST
कोहली 4-5 दिवसांपूर्वीच तयार... अचानक घेतलेल्या निवृत्तीवर रणजी प्रशिक्षकाचा विराटबद्दल मोठा खुलासा
Ranji Coach Sarandeep Singh Shocking Revelation on Virat Kohli Retirement

Coach sarandeep singh shocking revelation:12 मे हा दिवस विराट कोहचे चाहते कधीही विसरणार नाही. त्याच्या निवृत्तीच्या भावनिक पोस्टने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याच्या निवृत्तीची बातमी ऐकून केवळ चाहतेच नाही तर त्याचे रणजी प्रशिक्षकांनाही धक्का बसला आहे. त्याचे प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी विराटच्या नवृत्तीवर आश्यर्च व्यक्त केले आहेत. सरनदीप सिंग म्हणाले की, "कोहली इंग्लंड दौऱ्याच्या तयारीत व्यस्त होता आणि 2018 प्रमाणे 3-5 शतक झळकावण्याचीही त्याचा प्लॅन होता. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची बातमी ऐकून मी आश्चर्यचकित झालो आहे." 

माझ्यासाठी खूप मोठे आश्चर्य होते... 

जिओस्टारवर बोलताना सरनदीप सिंग म्हणाले की, " आज सकाळी मी  विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याची बातमी ऐकली. दिल्ली रणजी ट्रॉफीचा विचार केला तर तो ज्या पद्धतीने सामने खेळत होता त्यामुळे हे माझ्यासाठी खूप मोठे आश्चर्य होते. याच्या 4-5 दिवस आधी, आम्ही त्याच्याशी त्याला खेळायचे असलेल्या पुढच्या सामन्यांबद्दल बोलायला सुरुवात केलेली. त्यानेही आपला सहभाग दाखवला होता." 

हे ही वाचा: Imran Khan News: इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? पाकिस्तान सरकारने काय म्हटलंय जाणून घ्या

 

इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता

पुढे ते म्हणाले, " तो ऑस्ट्रेलिया दौरा कसा असेल याबद्दल बोलत होता, पण तो इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता. आपण कसोटी सामना कसा जिंकू? याब्फल तो बोलत होता. पण अचानक आता आपल्याला दिसते की जो माणूस इंग्लंडला जाण्यास तयार होता तो जाणार नाही. आज झालेल्या घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी बोलत होतो. मी त्याच्याशी मेसेजद्वारे बोललो. पण तो असा काही विचार करत असावा असं मला कधी त्याच्याशी बोलताना वाटलं नाही." 

हे ही वाचा: 80 कोटींचे अपार्टमेंट, 32 कोटींचा बंगला... विराट आहे किती कोटींचा मालक? जाणून घ्या कोहलीची Net Worth
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

हे ही वाचा: Virat Kohli Test Retirement: विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली?

3-4 शतक करायचा होता प्लॅन

ते कोहलीबद्दल पुढे म्हणाले की, "तो आयपीएलमध्ये ज्या पद्धतीने खेळत आहे, तो ज्या पद्धतीने धावा करत आहे हा ए उत्तम फॉर्ममध्ये आहे. मी त्याला विचारले की तो यानंतर काउंटी क्रिकेट खेळेल का? तो म्हणाला, नाही... भाऊ, मला इंडिया अ संघाकडून सामने खेळायचे आहेत. तो म्हणाला की तो इंडिया अ संघाकडून दोन सामने खेळेल आणि मग मी टेस्ट मॅचची तयारी करेन. विराट म्हणाला की त्याला 2018 च्या दौऱ्याप्रमाणे 3-4 शतके करायची आहेत आणि म्हणूनच तो इंडिया अ संघाकडून खेळण्याचा प्लॅन करत आहे. पण अचानक, मला कळले की तो खेळत नाहीये, हे खर्च आश्चर्यकारक आहे.