)
Curtis Campher 5 balls 5 Wickets: क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट, T-20 मध्ये, फलंदाज अनेकदा वर्चस्व गाजवतात. चाहत्यांना गोलंदाजीपेक्षा फलंदाजी पाहणे जास्त आवडते. T20 क्रिकेट म्हणजे धमाल आणि तीही प्रामुख्याने फलंदाजांची. पण जेव्हा एखादा गोलंदाज आपल्या चेंडूंवर धडाधड विकेट घेतो, तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्व बघतच बसतं. असाच एक चमत्कार नुकताच आयर्लंडमध्ये घडला आणि त्यामागे आहे होता कर्टिस कॅम्फर. कर्टिस कॅम्फर हा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने सलग 5 चेंडूंवर 5 विकेट्स घेतल्या आहेत.
हा रेकॉर्ड इंटर-प्रोविंसियल टी20 ट्रॉफीदरम्यान मुंस्टर रेड्स आणि नॉर्थ वेस्ट वॉरियर्स यांच्यातल्या सामन्यात घडली. मुंस्टर रेड्सकडून खेळणारा कॅम्फर १२व्या षटकात गोलंदाजीस आला आणि पाचव्या चेंडूवर जेरड विल्सनला बाद केलं. लगेच सहाव्या चेंडूवर ग्राहम ह्यूम एल्बीडब्ल्यू झाला.
14व्या षटकात परतलेल्या कॅम्फरने पहिल्याच चेंडूवर अँडी मॅकब्राइनला तंबू दाखवला. यासह त्याची हॅटट्रिक पूर्ण झाली. मग थांबायचं नाव न घेता त्याने पुढच्या दोन चेंडूंवर रॉबी मिलर आणि जोश विल्सनही बाद केलं. अशाप्रकारे त्याने पाच चेंडूंमध्ये पाच विकेट्स मिळवल्या. क्रिकेटच्या इतिहासात अशा कामगिरीचा मागोवा घेणंही अवघड आहे.
Curtis Campher 5 balls 5 Wickets. https://t.co/ypmGvx3Ia0 pic.twitter.com/zHIn6iNz4w
— H U S Nain (@H11USNAIN) July 10, 2025
या आधी फक्त दोनच गोलंदाजांनी सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या आहेत. एक नाव म्हणजे लसिथ मलिंगा (2007 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) आणि राशिद खान (2019 मध्ये आयर्लंडविरुद्ध) हे दुसरं नाव. पण कॅम्फरने याही विक्रमाला मागे टाकत आपलं नाव इतिहासात कोरलं आहे.
या कामगिरीनंतर एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली. T20 फॉर्मट फक्त फलंदाजांचं नसतो, तर एखादा गोलंदाजही आपल्या चेंडूंनी सामना फिरवू शकतो. आणि कॅम्फरने तर फक्त सामना नाही, तर संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे.