Neeraj Chopra Dancing video: ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही वर्षात तो आपल्या तडफदार कामगिरीमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलाय. खासकरून, नीरज चोप्रा त्याच्या शांत आणि लाजाळू स्वभावासाठी ओळखला जातो. पण एकदा मस्तीच्या मूडमध्ये आला की, काय कमाल करू शकतो, याची प्रचिती देणारा एक व्हिडिओ (Trending Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईमध्ये इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2023 (Indian Sports Honors 2023) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान नीरज चोप्रा काही खास अंदाजात दिसला. ब्रेझर घालून त्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ (Neeraj Chopra Dancing video) सध्या व्हायरल होतोय. या कार्यक्रमात नीरज चोप्रा डान्स करताना दिसला. देसी स्टाईलमध्ये नीरजचा डान्स पाहून अनेकांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास देखील बसला नाही.


आणखी वाचा - IPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!


रंगारंग कार्यक्रमानंतर डान्स फंक्शन सुरू झाला. त्यावेळी नीरज चोप्रा दोन्ही हातात ब्लेझर उचलून नाचताना पाहून सगळेच दंग झाले. आरपीएसजी आणि विराट कोहली (Virat kohli) फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा होता. त्यावेळी कलाकार आणि खेळाडूंनी धमाक केल्याचं दिसलं. त्यावेळी नीरज चोप्राने आपला रांगडा डान्स केला. त्याला पाहून अनेक कलाकारांनी आपल्या डान्सची झलक दाखवली.


पाहा VIDEO



दिग्गजांची हजेरी


टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनीही या पुरस्कार सोहळ्यात विशेष उपस्थिती लावली होती. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोणचे (Deepika Padukone) वडील प्रकाश पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हे दोन दिग्गज देखील कार्यक्रमात उपस्थित होते. त्याचबरोबर रुही दोसानी, यशराज मुखाटे आणि दीपराज जाधव यांनीही उपस्थिती दर्शविली होती.