Roman Reigns Brings Cricket Bat to WWE Ring: WWE रिंगमध्ये असा सीन सहसा पाहायला मिळत नाही. पण, या वेळेस रोमन रेन्स यांनी जे केलं, ते पाहून चाहत्यांनाही विश्वास बसला नाही. पर्थमध्ये झालेल्या WWE Crown Jewel 2025 सामन्यात ‘द ट्रायबल चीफ’ रोमन रेन्स थेट क्रिकेट बॅट घेऊन रिंगमध्ये उतरले. त्यांचा हा ‘विराट कोहली अवतार’ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
या सामन्यात रोमन रेन्सचा सामना ब्रॉन्सन रीडशी झाला. दोघांमधील हा सामना आधीपासूनच चर्चेत होता, पण सगळ्यांच्या नजरा रोमनच्या हातातील त्या क्रिकेट बॅटकडे वळल्या. व्हिडीओमध्ये दिसतं की, रेन्स एक बॉक्स उघडतात, त्यातून आधी एक रग्बी बॉल बाहेर फेकतात आणि नंतर क्रिकेट बॅट काढून थेट प्रतिस्पर्ध्याला मारायला जातात.
हे ही वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हासला डेट करते वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती? Viral Photo मुळे खळबळ!
तो क्षण जणू एखाद्या क्रिकेट सामन्यासारखा भासत होता. रेन्सने बॅट फिरवली, स्ट्रेट ड्राइव्हचा स्टाईल मारला आणि ब्रॉन्सन रीडला रिंगच्या बाहेर फेकलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा रिंगमध्ये जाऊन ब्रॉन्सनवर सलग वार केले. चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिलं “Roman Reigns turned Virat Kohli for a while!” तर काहींनी म्हटलं, “Cricket meets WWE!”
WWE इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे, जेव्हा एखाद्या सुपरस्टारने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारण्यासाठी क्रिकेट बॅटचा वापर केला. भारतीय चाहत्यांसाठी हा क्षण खास होता, कारण पर्थ हेच ठिकाण आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचं मैदान आहे.
हे ही वाचा: Shocking: कोलंबियाच्या घनदाट जंगलात लपलेले एक आलिशान घर, आतमध्ये गेल्यावर... बघा Photos
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत विराट कोहली बराच काळानंतर पुन्हा वनडे खेळताना दिसेल. तो सध्या इंग्लंडमध्ये असून लवकरच टीमसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. या मालिकेतील दुसरा सामना 23 आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.
रोमन रेन्सच्या या अनोख्या एंट्रीमुळे सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. चाहत्यांनी त्याच्या व्हिडीओला लाखो व्ह्यूज दिले आहेत. काहींनी त्याला “The Tribal Chief goes Desi!” असं कॅप्शन दिलं आहे.
हे ही वाचा: Rohit Sharma: ‘रोहित शर्मा युग संपलं’, ‘हिटमॅन’च्या एका पोस्टमुळे विश्व क्रिकेटमध्ये खळबळ!
BATTER UP! pic.twitter.com/qytfaTMilR
— WWE (@WWE) October 11, 2025
रोमन रेन्सचा हा स्टाइलिश क्रिकेट मूव्ह WWE चाहत्यांसाठी नव्या थ्रिलसारखा ठरला आहे. विराट कोहली पर्थमध्ये परतण्याच्या तयारीत असताना, रोमन रेन्सने आधीच त्या मैदानात ‘क्रिकेट’चा रंग चढवला आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.