देशाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचा अचानक मृत्यू, क्रिकेट जगतावर शोककळा

सोमवारी क्रिकेट जगतावर एका दिग्गज क्रिकेटरच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली. 1975 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेल्या क्रिकेटरचे निधन झाले आहेत. 

पूजा पवार | Updated: Oct 6, 2025, 05:30 PM IST
देशाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचा अचानक मृत्यू, क्रिकेट जगतावर शोककळा
(Photo Credit : Social Media)

Bernard Julien Death : क्रिकेट हा जगातील लोकप्रिय खेळांपैकी एक असून हा आंतरराष्ट्रीय खेळ खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना सुद्धा मोठी लोकप्रियता मिळते त्यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ होते. सोमवारी क्रिकेट जगतावर एका दिग्गज क्रिकेटरच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली. 1975 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा महत्त्वाचा भाग असलेले वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू बर्नार्ड ज्युलियन (Bernard Julien) यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. बर्नार्ड ज्युलियनने 24 टेस्ट आणि12 वनडे सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले होते. 

Add Zee News as a Preferred Source

बर्नार्ड ज्युलियन हे 1975 च्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाचा एक महत्त्वाचा भाग होते, ज्यांनी पाच सामन्यांमध्ये 17.70 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध बर्नार्ड ज्युलियनने 20 धावा देत 4 विकेट घेतले. त्यानंतर त्याने पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 1 विकेट घेतला. बर्नार्ड जूलियनच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्व शोकाकुल आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात ज्युलियनने 12 ओव्हरमध्ये 27 धावा देत 4 विकेट घेतले. विजेतेपदाच्या सामन्यात ज्युलियन आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून चमकला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 37 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या.

बर्नार्ड ज्युलियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष डॉ. किशोर शालो म्हणाले, 'आम्ही बर्नार्ड ज्युलियन यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि प्रियजनांना प्रति आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी क्रिकेट वेस्ट इंडिज तुमच्यासोबत आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील'.

बर्नार्ड ज्युलियन कारकीर्द : 

बर्नार्ड ज्युलियनने 1973 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 24 टेस्ट सामने खेळले, 50 विकेट्स घेतल्या आणि 30.92 च्या सरासरीने 866 धावा केल्या. 12 वनडे सामन्यांमध्ये ज्युलियनने फलंदाजीत 86 धावा केल्या आणि 18 विकेट्सही घेतल्या.

FAQ : 

बर्नार्ड ज्युलियन कोण होते आणि त्यांच्या निधनाबाबत काय माहिती आहे?
बर्नार्ड ज्युलियन हे वेस्ट इंडिजचे माजी अष्टपैलू क्रिकेटर होते. सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. या बातमीमुळे क्रिकेट जगत शोककळा पसरली. त्यांनी १९७५ च्या वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

बर्नार्ड ज्युलियन यांची १९७५ च्या वर्ल्ड कपमधील कामगिरी कशी होती?
१९७५ च्या वर्ल्ड कपमध्ये ज्युलियन यांनी पाच सामन्यांमध्ये १७.७० च्या सरासरीने १० विकेट घेतल्या. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी २० धावा देत ४ विकेट घेतल्या. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी १ विकेट घेतली. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ओव्हरमध्ये २७ धावा देत ४ विकेट घेतल्या. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.

बर्नार्ड ज्युलियन यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर काय परिणाम झाला?
ज्युलियन यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकाकुल झाले. ते १९७५ च्या चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाचे महत्त्वाचे सदस्य होते, ज्यामुळे त्यांच्या योगदानाची आठवण सतत राहील. क्रिकेटर आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.

About the Author