Ind v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट

Ind Vs Eng 1st T20i At Kolkata Eden Gardens Weather And Pitch Report: भारत विरुद्ध इंग्लंड T20I या बुधवारी, 22 जानेवारीला कोलकाता येथे होणाऱ्या सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 22, 2025, 10:50 AM IST
Ind v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट
Photo Credit: PTI, BCCI/X

Ind Vs Eng 1st T20i At Kolkata Eden Gardens: भारत आणि इंग्लंड संघ बुधवारी, 22 जानेवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर 5 सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. भारत T20 विश्वचषक चॅम्पियन बनल्यानंतर, रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यामुळे कर्णधार पदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे आली. 

Add Zee News as a Preferred Source

चाहत्यांसाठी आहे खास मालिका 

भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टिकोनातून ही मालिका खास आहे. याचे कारण असे की या मालिकेत टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे विश्वचषक फायनलनंतर संघात पुनरागमन करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो पुनरागमन करत आहे. शमीच कमबॅक हे भारतीय संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या बॅटवरही चाहत्यांची नजर असेल.

हे ही वाचा: मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

 

कोलकातामध्ये हवामान कसे आहे? 

आज, कोलकाता येथील सामन्यासाठी हवामान अनुकूल आहे. बुधवारी तेथील आकाश निरभ्र राहील. 22 जानेवारी रोजी शहराचे कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस असेल. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल त्यावेळी  तापमान घसरण्यास सुरुवात होईल. तापमान घसरून किमान 16 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचेल. पावसाची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. आर्द्रतेचे प्रमाण 77 टक्क्यांपर्यंत राहील.

हे ही वाचा: 2 तास 37 मिनिटांचा 'तो' चित्रपट, ज्याने सर्व ॲक्शन-थ्रिलर चित्रपटांवर फिरवले पाणी; याच्यापुढे 'महाराजा'ही झाला फेल

 

ईडन गार्डन्स खेळपट्टी अहवाल

कोलकात्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी आणि वेग मिळतो. पण असे असूनही फलंदाजांना ही खेळपट्टी खूप आवडते. खेळ जसजसा पुढे जातो तसतसा तो हळू होतो. यावेळीही खेळपट्टी फलंदाजीसाठी योग्य असेल आणि नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देईल असे वाटत आहे.

हे ही वाचा: सिंगल पिलरवर उभा आहे 8 लेनचा रस्ता, अर्धा प्रवास जमिनीपासून 20 फूट उंचीवर तर बाकीचा जमिनीखाली; सर्वात छोटा एक्सप्रेस एखादा पाहाच

 

कोलकात्याच्या मैदानावर भारताचा विक्रम

या मैदानावरील भारताच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने या मैदानावर आतापर्यंत 7 T20I आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 6 जिंकले आहेत. 2011 मध्ये इंग्लंड संघाने भारताला हरवले होते तो भारताचा एकमेव इंग्लंडविरुद्धचा पराभव होता.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More