प्रायव्हेट जेट आणि लक्झरी गाड्या...निवृत्तीनंतरही MS Dhoni कसा कमवतोय करोडो रुपये? जाणून घ्या Net Worth

Happy Birthday MS Dhoni: 7 जुलै 2025 रोजी 44 वर्षांचा झालेला महेंद्रसिंग धोनी केवळ क्रिकेटमध्येच नाही तर व्यवसाय आणि ब्रँडिंगच्या जगातही एक चमकणारा तारा आहे. 'कॅप्टन कूल' ने संघाला मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवून दिले आहेत आणि मैदानाबाहेर स्वतःला एक यशस्वी आयकॉन बनवले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jul 7, 2025, 06:57 PM IST
प्रायव्हेट जेट आणि लक्झरी गाड्या...निवृत्तीनंतरही MS Dhoni  कसा कमवतोय करोडो रुपये? जाणून घ्या Net Worth

MS Dhoni Net Worth: भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या आयकॉनपैकी एक असणारा महेंद्रसिंह धोनी याने आज 7 जुलै 2025 रोजी वयाची 44 वर्षं पूर्ण केली. मैदानावर शांत स्वभाव, अचूक निर्णय क्षमता आणि धडाडीच्या खेळींसाठी ओळखला जाणारा 'कॅप्टन कूल' आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही धोनीची कमाई आणि ब्रँड व्हॅल्यू अव्वलच आहे. पण नक्की कशी आणि कुठून येते ही कमाई? किती  आहे माहीची नेट वर्थ? चला, जाणून घेऊयात.

Add Zee News as a Preferred Source

1000 कोटींपेक्षा अधिक संपत्तीचा मालक

धोनीची एकूण संपत्ती सध्या 120 मिलियन डॉलर्सहून अधिक म्हणजेच जवळपास 1000 कोटींहून जास्त आहे. आयपीएलमध्ये 18 सीझन खेळलेला माही, या लीगमधून एकट्यानेच 204 कोटींपेक्षा अधिक कमावले आहेत. 2018 ते 2021 दरम्यान त्याचा वार्षिक पगार 15 कोटी होता, तर 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने त्याला 4 कोटींना रिटेन केलं. त्याची ब्रँड व्हॅल्यू 2025 मध्ये 803 कोटींवर पोहोचली आहे.  ज्यातून तो दरवर्षी किमान 50 कोटी कमावतो. यामध्ये जाहिराती, इन्व्हेस्टमेंट्स आणि व्यवसाय यांचा मोठा वाटा आहे.

खेळाच्या पलीकडेही ‘विनिंग शॉट’

धोनीने खेळाबाहेरही स्वतःला एक यशस्वी व्यावसायिक आणि गुंतवणूकदार म्हणून सिद्ध केलं आहे. स्पोर्ट्स, फॅशन, रिअल इस्टेट आणि एंटरटेनमेंट क्षेत्रांमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्याची '7 ब्रँड' क्रीडा शूजची कंपनी आहे. हॉकीमध्ये तो रांची रेज फ्रँचायझीचा मालक आहे. Dhoni Entertainment Pvt. Ltd. या बॅनरखाली काही चित्रपट निर्मिती प्रकल्पही सुरू आहेत. 

जाहिरातींमधून करोडोंची कमाई

धोनीने आजवर 70 पेक्षा अधिक ब्रँड्ससोबत काम केलं आहे. ड्रीम11, बूस्ट, ओरिएंट फॅन, रेडबस, भारत मॅट्रिमोनी, स्वराज ट्रॅक्टर्स अशा विविध क्षेत्रांतील ब्रँड्ससोबत धोनीची जाहिरात भागीदारी आहे. या डील्समधून त्याला वर्षाला कोट्यवधींचा लाभ होतो. धोनी केवळ ब्रँड अँबेसडर नाही, तर एक विश्वसनीय चेहरा म्हणूनही कॉर्पोरेट जगतात ओळखला जातो.

लक्झरी गाड्या आणि बाईक प्रेम

गाड्यांबाबत धोनीचं प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या गैराजमध्ये 20 हून अधिक बाईक्स आहेत.

  • कावासाकी निंजा H2
  • डुकाटी 1098
  • यामाहा RD350

धोनीचे कार कलेक्शनमध्येही  तितकाच भारी आहे:

  • हमर H2
  • फेरारी
  • रोल्स रॉयस
  • ऑडी Q7
  • जीप ग्रँड चेरोकी
  • 1969 Ford Mustang – एक व्हिंटेज क्लासिक

या सगळ्या गाड्या त्याच्या फार्महाऊस आणि इतर ठिकाणी वारंवार पाहायला मिळतात.

प्रायव्हेट जेट: अफवा की वास्तव?

धोनीकडे प्रायव्हेट जेट असल्याच्या चर्चा बर्‍याचदा समोर येतात. जरी याची अधिकृत पुष्टी झालेली नाही, तरी अनेक रिपोर्ट्स त्याच्याकडे प्रायव्हेट जेट असल्याचा दावा करतात.

रिअल इस्टेट गुंतवणूक आणि 'राजमहाल'

रांचीमधील त्याचा फार्महाऊस म्हणजे निसर्गाच्या कुशीत वसलेलं भव्य वास्तू आहे. त्याचं घर रांची, पुणे, देहरादून, मुंबई आणि दुबईमध्येही आहे. रांचीच्या फार्महाऊसमध्ये त्याने घोड्यांपासून ते ऑर्गेनिक शेतीपर्यंत अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे.

सिंपल पण प्रभावी लाइफस्टाइल 

इतकी संपत्ती असूनही धोनीचा लाइफस्टाइल साधी आहे. गोंधळ न करता, मीडिया पासून लांब राहून, तो आपल्या कुटुंबासोबत शांत आयुष्य जगतोय आणि क्रिकेटसोबत आपली व्यावसायिक कारकीर्द बळकट करत आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More