What is Vajra Super Shot: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएल २०२५ च्या सामन्यांमध्ये वज्र सुपर शॉट बसवण्यात आला. हे नक्की काय आहे? आणि कशासाठी वापरले जाणार याबद्दल जाणून घ्या.

Vajra Super Shot at IPL 2025 Venues: 22 एप्रिल रोजी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या (Pahagam Terror Attack) झाली. या दुर्घटनेनंतर बीसीसीआयही सतर्क झाले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात तुम्हाला एक वेगळी गोष्ट दिसली असेल. ही गोष्ट म्हणजे वज्र सुपर शॉट आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्याचा परिणाम आयपीएल सामन्यांवरही दिसून आला. सध्या सुरू असलेल्या आयपीएल 2025 स्पर्धेत नवीन सुरक्षा उपाययोजना करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. शनिवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात वज्र सुपर शॉटचा वापर करण्यात आला. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, जगभरातून अनेक मोठे खेळाडू त्यात खेळत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत बीसीसीआय कोणतीही निष्काळजीपणा करू इच्छित नाही. यासाठी वज्र सुपर शॉट हे तंत्रज्ञान आणले गेले आहे जे आता ते प्रत्येक सामन्यात वापरले जाईल.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीबीबीएस (BBBS- Big Bang Boom Solutions Pvt. Ltd.) ने शनिवारी देशभरातील इंडियन प्रीमियर लीग 2025 सामन्यांदरम्यान हवाई सुरक्षेसाठी त्यांची स्वदेशी अँटी-ड्रोन प्रणाली, वज्र सुपर शॉट तैनात करण्याची घोषणा केली. हे एक खास अँटी-ड्रोन उपकरण आहे. हे हलके, पोर्टेबल आणि कुठेही घेऊन जाण्यास सोपे आहे. हे उपकरण चार किलोमीटर अंतरावरून ड्रोन शोधू शकते आणि निष्क्रिय करू शकते.
हे ड्रोनच्या नियंत्रणात व्यत्यय आणणारे रेडिओ सिग्नल पाठवून कार्य करते. एकदा ड्रोन आणि त्याच्या ऑपरेटरमधील संपर्क तुटला की, ड्रोन एकतर क्रॅश होतो किंवा त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणी परत येतो. यामुळे स्टेडियम परिसरात धोकादायक किंवा अज्ञात ड्रोन प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते.
#iDEX winner Big Bang Boom Solutions @BigBangBoomSoln has successfully shipped the first Vajra Super Shot developed under #iDEX to the Kenyan Ministry of Defence
— iDEX DIO (@India_iDEX) January 28, 2025
Facilitated by @DefProdnIndia this export is a testament to #MakeInIndia’s growing impact in global defence innovation pic.twitter.com/f0rVNGQeG9
26 एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याने पहिल्यांदा वज्र सुपर शॉटचा वापर करण्यात आला. तेव्हापासून, ते सर्व आयपीएल सामन्यांच्या स्टेडियमवर वापरण्यासाठी सज्ज झाला आहे. सुरक्षा पथकांना हे उपकरण वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या लोकांचे काम सतत आकाशाचे निरीक्षण करणे आहे. जर त्यांना कोणताही संशयास्पद ड्रोन दिसला तर ते स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या लोकांना इजा न करता ते सुरक्षितपणे पाडण्यासाठी वज्र सुपर शॉटचा वापर करणार.