IPL 2025 : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला शनिवार 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. आयपीएल 2025 चा पहिला सामना हा ईडन गार्डन स्टेडियमवर गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवण्यात येईल. यंदा स्पर्धेत एकूण 10 संघांचा सहभाग असून यांच्यात तब्बल 74 सामने खेळवले जातील. जवळपास दोन महिने ही स्पर्धा सुरु असणार असून क्रिकेट रसिकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे.
आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा पराभव करून दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरल होतं. 22 मार्च रोजी आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च तर 25 मे रोजी आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाईल. यंदा भारतातील विविध 13 स्टेडियमवर आयपीएलचे 74 सामने खेळवले जातील. आयपीएल 2025 चा पहिला आणि शेवटचा असे दोन्ही सामने कोलकाताच्या ईडन गार्डनवर होतील.
आयपीएल 2025 चे सामने प्रेक्षक टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहू शकतात. हिंदी, इंग्रजी सहित यंदा मराठी सह इतर भाषांमध्ये सुद्धा सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडेल. आयपीएल 2025 मध्ये संध्याकाळी खेळवले जाणारे सामने हे भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरु होतील त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस होईल. तर डबल हेडर सामने दुपारी 3 : 30 वाजता खेळवण्यात येईल. तर या सामन्याचा टॉस 3 वाजता होईल.
हेही वाचा : IPL 2025 चा पहिलाच सामना होणार रद्द? KKR VS RCB मॅचवर पावसाचे ढग, पाहा Weather Report
आयपीएल 2025 च्या ओपनिंग सेरेमनी सायंकाळी 6 च्या सुमारास सुरु होईल. या ओपनिंग सेरेमनीमध्ये श्रेया घोषाल, दिशा पाटनी, करण औजला सारखे अनेक कलाकार परफॉर्मन्स देतील. आयपीएल 2025 च्या ओपनिंग सेरेमनीचा दिमाखदार सोहळा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि जिओ हॉटस्टारवर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पार पडेल.
आयपीएलचे डिजिटल राईट्स जिओने खरेदी केल्यापासून मागील दोन वर्ष जिओ सिनेमावर प्रेक्षक आयपीएल सामने फुकटात पाहू शकत होते. मात्र आता तसे होणार नाही. प्रेक्षकांना जिओ हॉटस्टारवर आयपीएल सामने पाहण्यासाठी त्यांचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. परंतु जिओचे काही रिचार्ज प्लान असे आहेत ज्यामधून तुम्हाला जिओ हॉटस्टारचा फ्री एक्सेस मिळू शकतो.
जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी 100 रुपयांचा एक खास प्रीपेड प्लान उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही रिचार्ज सोबतच आयपीएल 2025 सामने फ्रीमध्ये पाहू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि SMS चं ऑप्शन मिळत नाही मात्र तुम्हाला 5 GB डेटा ऑफर केला जातो. हा प्लान घेतल्यास तुम्हाला जिओ हॉटस्टारचा फ्री एक्सेस मिळतो. यासह Airtel आणि Vi सारख्या कंपन्या सुद्धा जिओ हॉटस्टारचा फ्री एक्सेस असणारे प्लॅन देतात. यामुळे क्रिकेट चाहते फ्रीमध्ये जिओ हॉटस्टारवर फ्रीमध्ये आयपीएल 2025 चे सामने पाहू शकतात.