Where to Watch India A vs Pakistan A Live Streaming: रायझिंग स्टार्स आशिया कपमध्ये आज, 16 नोव्हेंबरला दोहा येथे इंडिया ए आणि पाकिस्तान ए यांच्यात हाय-वोल्टेज सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकत दमदार सुरुवात केली आहे. विशेषत: 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात वादळ घालत क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे.
यूएईविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 42 चेंडूत 144 धावा फटकावत धुमाकूळ घातला होता. या इनिंगमध्ये 15 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. त्यांच्या या तुफानी खेळीमुळे इंडिया ए ने 20 षटकांत 297/4 धावा केल्या. कर्णधार जितेश शर्मानेही 32 चेंडूत 83 धावा ठोकत टीमला मोठा स्कोअर उभा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर इंडिया ए ने हा सामना 148 धावांनी जिंकला.
पाकिस्तान शाहीन्सने आपला पहिला सामना ओमानविरुद्ध 40 धावांनी जिंकला आहे. दोन्ही संघ फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना रोमांचक होणार हे निश्चित मानले जात आहे.
वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, जितेश शर्मा (कर्णधार), निहाल वढेरा, रमनदीप सिंह, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, विजयर कुमार वैश्याक, गुरजपनीत सिंह, सुयश शर्मा, यश ठाकूर, युधवीर सिंह चरक, अभिषेक पोरेल, नमन धीर, सूर्यांश शेजगे.
यासिर खान, मोहम्मद नईम, मोहम्मद फैक, माज़ सादाकत, गाजी घोरी (विकेटकीपर), इर्फान खान (कर्णधार), साद मसूद, मुबासिर खान, अबैद शाह, अहमद दानियाल, मोहम्मद सलमान, पृथ्वीकुमार मच्छी, हसनैन शाह, शुएब अल बलूशी, उबैद उल्लाह, एमडी यूसुफ.
India A vs Pakistan A रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 सामना आज – 16 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
हा सामना वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दोहा (कतार) येथे रंगणार आहे.
हा सामना Sony Sports Network चॅनेल्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
इंडिया A vs पाकिस्तान A सामना SonyLiv अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे.
मोबाईल, लॅपटॉप, टॅब किंवा स्मार्ट टीव्हीवर SonyLiv वर हा सामना पाहता येईल.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.