kieron pollard ipl controversey : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीगपैकी एक आहे. यात असे काही सामने झालेत जे क्रिकेट फॅन्स विसरू शकत नाहीत. अनेकदा आयपीएल सामन्यांमध्ये खेळाडू एकमेकांशी भिडतात पण एका सामन्यात असं काही झालं ज्यात एक खेळाडू थेट अंपायरशी भिडला. 2015 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स (RCB VS MI) यांच्यात सामना खेळवला गेला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर कायरन पोलार्डने (kieron pollard) आपल्या तोंडावर चिकटपट्टी लावून विरोध दर्शवला होता.
मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्स समोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यावेळी खेळाडूंना माहित होतं की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेलची फलंदाजी चालली तर ते सामन्यात पराभूत होतील. तेव्हा कायरन पोलार्ड हा त्याच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना चांगलं ओळखत होता. तेव्हा त्याने स्लेजिंग सुरु केली आणि तो मैदानात क्रिस गेलला लागोपाठ त्रास देत होता. मैदानात असलेले अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ आणि विनीत कुलकर्णी यांनी पोलार्डच्या आक्षेप घेतला आणि पोलार्डला शांत राहण्यास सांगितलं.
अंपायरने पोलार्डला शांत राहण्यास सांगितलं याचा विरोध दर्शवण्यासाठी पोलार्डने जे केलं ते पाहून सर्वच हैराण झाले. कायरन पोलाने त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावली आणि विरोध दर्शवला. पोलार्डने तोपर्यंत मौन धारण केलं जोपर्यंत तो तो सामन्याची शेवटची ओव्हर टाकायला आला नाही. गोलंदाजी करण्यापूर्वी त्याने तोंडावरील चिकटपट्टी काढली.
मॅन ऑफ द मॅच निवडलेल्या हरभजन सिंहला या जेव्हा या घटनेबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला की, 'पंचांनी त्याला शांत राहायला सांगितले, म्हणून तो गप्प राहावा यासाठी त्यांनी त्याचे तोंड टेपने बांधले. तो जरा वेगळ्याच प्रकारचा खेळाडू आहे आणि त्याला त्यासाठी लोकं पसंत करतात'. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजच्या खेळाडूंची एक वेगळी बाजू पाहायला मिळते आणि ही घटना काहीतरी वेगळी होतो.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.