When will Rishabh pant return to ground: भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-बॅटर ऋषभ पंत लवकरच मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन लवकरच होण्याची अपेक्षा आहे. पंत पायाच्या बोटाच्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याचं रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन जवळपास निश्चित मानलं जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे तो पाच कसोटींच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे त्याला आशिया कप, वेस्टइंडीजविरुद्धची टेस्ट मालिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी व्हाईट-बॉल सिरीजही गमवावी लागली.
हे ही वाचा: वडिलांच्या एका सल्ल्याने बदललं 'या' खेळाडूच आयुष्य! व्हायचं होतं इंजिनियर पण झाला स्विंग मास्टर
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, ऋषभ पंत दिल्ली संघासाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. ही स्पर्धा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तथापि, बीसीसीआयची वैद्यकीय टीम अजूनही त्याच्या फिटनेसचा आढावा घेत आहे. बोर्डाचं मत आहे की पंतने पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच मैदानात उतरावं.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते, “पंतची रिकव्हरी प्रक्रिया लांबली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत त्याला खेळण्याची परवानगी मिळू शकते. या आठवड्यात त्याची फिटनेस तपासली जाईल. बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही.”
पंतने दिल्ली क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए)ला सांगितलं आहे की तो 25 ऑक्टोबरपासून होणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी उपलब्ध असू शकतो. मात्र, अंतिम निर्णय बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमकडे आहे. डीडीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, “पंतने अजून निश्चित तारीख सांगितलेली नाही. तो मेडिकल टीमच्या हिरव्या कंदिलाची वाट पाहत आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी वेळ कमी आहे. जर तो फिट ठरला, तर तो दिल्ली संघाचं नेतृत्व करू शकतो.”
हे ही वाचा: Rohit Sharma: ‘रोहित शर्मा युग संपलं’, ‘हिटमॅन’च्या एका पोस्टमुळे विश्व क्रिकेटमध्ये खळबळ!
सुरुवातीला अपेक्षा होती की पंतला पूर्ण बरा होण्यासाठी सुमारे सहा आठवडे लागतील. मात्र दुखापतीनंतर लगेच खेळण्याचा प्रयत्न केल्याने स्थिती थोडी गंभीर झाली होती. तरीही गेल्या 20 दिवसांत त्याची रिकव्हरी जलद गतीने झाली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटींची मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. जर पंतला बीसीसीआयकडून वैद्यकीय मंजुरी मिळाली, तर तो 5 नोव्हेंबरपूर्वी एक-दोन रणजी सामने खेळू शकतो. त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आवश्यक ते मॅच प्रॅक्टिस मिळेल.
हे ही वाचा: Washington Sundar Birthday: हिंदू असूनही असं नाव का? वॉशिंगटन सुंदरच्या नावामागचं किस्सा जाणून घ्या
ऋषभ पंतसाठी ही पुनरागमनाची मालिका ठरू शकते, ज्यामध्ये तो केवळ रणजी नव्हे तर आगामी आंतरराष्ट्रीय सिझनसाठी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.