ICC Cricket 9 New Rules: टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तोंडावर क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले आहेत. मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने 3 फेब्रुवारी रोजी या नव्या नियमांची माहिती दिली. हे बदल अधिकृतपणे 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होतील. मात्र, यातील काही नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आधीच स्वीकारले आहेत. हे नवे नियम केवळ टी20 नव्हे, तर एकूणच क्रिकेटच्या खेळावर परिणाम करणारे आहेत. चेंडूचा आकार आणि वजन, बॅटची रचना, अपूर्ण धावा, ओव्हरथ्रो, हिट विकेट, विकेटकीपरची स्थिती अशा अनेक बाबींमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला, एक नजर टाकूया या 9 महत्त्वाच्या नियमांवर.
आतापर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकाच साइजचा चेंडू वापरला जात होता. आता महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी वेगळ्या आकार व वजनाचे चेंडू वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
साइज 1: पुरुष क्रिकेट
साइज 2 आणि 3: महिला व ज्युनियर क्रिकेट
महिला खेळाडू आणि लहान मुलांचे हात तुलनेने छोटे असल्याने, हा बदल गरजेचा असल्याचे MCC ने स्पष्ट केले.
बॅट दिवसेंदिवस महाग होत असल्याने MCC ने लॅमिनेटेड बॅट वापरण्यास परवानगी दिली आहे, विशेषतः ओपन एज क्रिकेटमध्ये. या बॅटमध्ये तीन वेगवेगळ्या लाकडी थरांचा वापर करता येईल. अभ्यासानंतर असे आढळले की, या बॅटमुळे खेळाडूला अतिरिक्त फायदा मिळत नाही. मात्र, आंतरराष्ट्रीय किंवा सर्वोच्च स्तरावर अजूनही एकाच लाकडाची बॅट वापरली जाईल.
आता दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट पडली तरी ओव्हर पूर्ण खेळवला जाईल. याआधी विकेट पडताच खेळ थांबवला जात असे, ज्यामुळे अनेकदा गोलंदाज संघाला संधी गमवावी लागत होती.
जर फलंदाज जाणीवपूर्वक अपूर्ण धाव घेत असेल, तर आता फील्डिंग संघ ठरवू शकतो की पुढील चेंडूवर कोणता फलंदाज स्ट्राइकवर असेल. हा नियम बॅटिंग संघाला अन्यायकारक फायदा घेण्यापासून रोखण्यासाठी आहे.
बाउंड्रीजवळ कॅच घेताना फील्डर जर मैदानाबाहेर गेला, तर त्याला फक्त एकदाच चेंडू मैदानात परत आणण्याची संधी मिळेल. वारंवार उड्या मारत चेंडू ढकलणे किंवा खेळात ठेवणे आता बेकायदेशीर ठरेल.
जर फील्डरने रनआउटसाठी थ्रो केला आणि कोणीही चेंडू अडवण्याचा प्रयत्न न करता तो पुढे गेला, तर तो ओव्हरथ्रो मानला जाईल. मात्र, चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि तरीही तो निसटला, तर ती मिसफिल्ड मानली जाईल.
आता चेंडू सॅटल (डेड) मानण्यासाठी तो फक्त गोलंदाज किंवा विकेटकीपरकडेच असावा, असे बंधन नाही. जर एखादा फील्डर एका जागी स्थिर उभा असून चेंडू त्याच्याकडे गेला, तर अंपायर तो चेंडू सॅटल घोषित करू शकतो.
गोलंदाज रनअपमध्ये असताना विकेटकीपरचे हात स्टंप्सपुढे असले, तरी तो नो-बॉल ठरणार नाही. मात्र, चेंडू सोडल्यानंतर विकेटकीपरचे हात पूर्णपणे स्टंप्सच्या मागे असणे आवश्यक आहे.
जर फलंदाज किंवा त्याचे साहित्य (बॅट, हेल्मेट, पॅड्स) एखाद्या फील्डरला लागून स्टंप्सवर आदळले, तर तो हिट विकेट मानला जाणार नाही. मात्र, कोणताही बाह्य संपर्क न होता शॉट खेळताना स्टंप्स पडले, तर तो फलंदाज हिट विकेट आऊट ठरेल.
रनआउट किंवा स्टंपिंगसाठी चेंडू पूर्णपणे हातात असणे आवश्यक
आता रनआउट किंवा स्टंपिंग वैध ठरण्यासाठी चेंडू फील्डर किंवा विकेटकीपरच्या हातात पूर्णपणे असणे बंधनकारक आहे. फक्त चेंडूला स्पर्श झाल्यास फलंदाज आऊट मानला जाणार नाही अगदी कॅचच्या नियमासारखेच.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
SCO
(20 ov) 170/7
|
VS |
NEP
171/3(19.2 ov)
|
| Nepal beat Scotland by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
CAN
(20 ov) 173/4
|
VS |
NZ
176/2(15.1 ov)
|
| New Zealand beat Canada by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.