Ashok Dinda love story : सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळाल्यानंतर माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा याच्या यशामागे कोण आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा याची पत्नी श्रेयसी रुद्र हे मागील अनेक वर्षांपासून सोबत आहेत. तुम्हाला त्याच्या प्रेमकहाणीबद्दल माहिती आहे का?

भारतीय संघातील माजी गोलंदाज अशोक डिंडा सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये निवडणुक जिंकली आहे. भारतीय जनता पार्टीचे तिकट त्याला मिळाले होते. तिकीट मिळाल्यानंतर मोयना विधानसभेची उमेदवारी त्याला मिळाली. मागील निवडणूकीमध्ये निवडणूक लढवून त्याला याच मतदारसंघामधून आमदारकी मिळाली होती. मोयनाच्या नागरिकांनी त्याला सलग दुसऱ्यांदा जिंकवले आणि त्याच्यावर विश्वास दाखवला. पण तुम्हाला माहिती आहे का? माजी गोलंदाज अशोक डिंडा याच्या यशामागे तुम्हाला कोण आहे, त्याच्या यशामागचे कारण कोण आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळाल्यानंतर माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा याच्या यशामागे त्याची पत्नी आहे. तिने नेहमीच त्याची साथ दिली आहे. माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा याची पत्नी श्रेयसी रुद्र हे मागील अनेक वर्षांपासून सोबत आहेत. तुम्हाला त्याच्या प्रेमकहाणीबद्दल माहिती आहे का?
भारताच्या या माजी खेळाडूने टीम इंडियासाठी 2009 ते 2013 यादरम्यान आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने या कालावधीमध्ये 22 सामने खेळले होते. अशोक डिंडा याची पत्नी श्रेयसी रुद्र ही क्रिकेट फॅन देखील आहे आता ती अशोक डिंडा याला राजकारणामध्ये पाठिंबा देत आहे. अशोक डिंडा याला श्रेयसी रुद्र हिला पत्नी बनवण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागले आहेत. 2013 मध्ये या दोघांनी लग्न केले होते, लग्न केल्यानंतर त्याची पत्नी श्रेयसी रुद्र गृहिणी बनली, त्याआधी ती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती.
हे ही वाचा
श्रेयसी रुद्र हिला क्रिकेटची फार आवड होती, जेव्हा डिंडा हा आयपीएल खेळत होता त्यावेळी ती बऱ्याचदा स्टेडियममध्ये अशोक डिंडाला पाहण्यासाठी आणि सपोर्ट करण्यासाठी येत असे. फक्त श्रेयसीच नाही तर सामने पाहण्यासाठी तिची आजी देखील क्रिकेट पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येत असे. अशोक डिंडाने त्याच्या एका जुन्या मुलाखतीमध्ये त्याच्या प्रेमकाहणीबद्दल सांगितले होते. मुलाखतीमध्ये खेळाडूने सांगितले होते की ते दोघे एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यानंतर त्याच्या दोघांमध्ये संवादाला सुरुवात झाली होती.
एकमेकांची ओळख झाल्यानंतर त्यांनी फोन नंबर एक्सचेंज केले होते. अशोक डिंडा याला त्याच्या मित्राच्या माध्यमामधून श्रेयसीचा नंबर मिळाला आणि अशा प्रकारे त्यांच्या बोलणे सुरु झाले होते. त्यांनी दोघांनी 2.5 वर्ष एकमेकांना डेट केले आणि 22 जुलै 2013 रोजी या जोडप्याने लग्न केले. सुमारे अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्याने त्याच्या आईशी ओळख करुन दिली. यावेळी त्याला वाटले की त्याची आई त्यांच्या नात्याला सहमती देणार नाही असे त्याला वाटले होते. शेवटी प्रेमाचा विजय झाला आणि त्याच्या आईने त्याच्या नात्याला सहमती दर्शवली.