Who is Ashutosh Sharma: आयपीएल 2025 चा चौथ्या सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा रंगला. हा सामना फारच हटके ठरला. अगदी शेवटच्या क्षणी या सामन्याचे निकाल पलटले. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एक रोमांचक विजय (Delhi Capitals vs Lucknow Super Giants, 4th Match) मिळवला. दिल्लीने 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकेकाळी 113 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. पण तिथून विपराज निगम आणि आशुतोष शर्मा यांनी सामना हातात घेतला. त्या दोघांनी आपल्या फलंदाजीने सामना फिरवला. आशुतोषने षटकार मारून सामना संपवला. अत्यंत चुरशी असा हा सामना झाला. अखेरीस दिल्ली संघाने एका विकेटने हा सामना जिंकला.
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर लखनौने 20 षटकात 8 विकेट गमावत 208 धावा केल्या. एकेकाळी अक्षरचा निर्णय चुकीचा ठरतोय असं वाटत होतं. पण शेवटी आशुतोष आणि विपराज निगमने डावाची धुरा सांभाळत 22 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली.
हे ही वाचा: तमीम इकबालचा ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक Video Viral, सामन्यादरम्यान मैदानात आला होता हृदयविकाराचा झटका
विपराजने 15 चेंडूत 39 धावा केल्या आणि विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर बाकी विकेट पडत राहिल्या, पण रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या आशुतोष खम्बिर उभा राहिला. त्याने शेवटी सामना जिंकवूनच दखवला. गेल्या सिजनमध्येही आशुतोषने शानदार फलंदाजी केली होती, मात्र त्याला त्यावेळी जास्त संधी मिळाली नव्हती. यावेळी मात्र त्याने पहिल्याच सामन्यात आपले स्किल दाखवून सगळ्यांना आश्यर्यचकित केले.
हे ही वाचा: इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर
And he does it in
Ashutosh Sharma, take a bow!
A #TATAIPL classic in Vizag
Updates https://t.co/aHUCFODDQL#DCvLSG | @DelhiCapitals pic.twitter.com/rVAfJMqfm7
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2025
२६ वर्षीय आशुतोषचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. वयाच्या 8 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि क्रिकेटर बनण्यासाठी इंदूरला आले. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी छोट्या नोकऱ्या करून कसेतरी आपले आयुष्य जगले. यावेळी आशुतोषला इतरांचे कपडेही धुवावे लागले. उदरनिर्वाहासाठी त्यांने अनेक कामे केली. पण माजी क्रिकेटपटू अमय खुर्सियाने त्याचे आयुष्य बदलून टाकले.
Ashu, we love you!! pic.twitter.com/DzA88gcXdw
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 24, 2025
हे ही वाचा: वडील ऑटो ड्रायव्हर, ना देशांतर्गत खेळण्याचा अनुभव; IPL मध्ये पदार्पण करणारा MI चा विघ्नेश पुथूर आहे तरी कोण?
अमय खुर्सिया यांनी आशुतोषच्या स्किलला ओळखले आणि त्याला त्याचा खेळ सुधारण्यासाठी खूप काम केले. हा खेळाडू हळूहळू मध्य प्रदेश संघापर्यंत पोहोचला. मात्र, काही कारणास्तव त्याला ही टीम सोडून रेल्वेमध्ये जावे लागले. त्याला तिथे खेळण्याची खूप संधी मिळाली. त्याला रेल्वेत नोकरीही मिळाली. 17 ऑक्टोबर 2023 रोजी आशुतोषने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने एका T20 सामन्यात अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक झळकावून खळबळ उडवून दिली होती. अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने तुफानी फलंदाजी केली. यानंतर त्याला पंजाब किंग्जमध्ये संधी मिळाली आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याला प्रीती झिंटाच्या टीमने 20 लाख रुपयांना विकत घेतले.