IPL Captain Price: इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत, मोठी आणि प्रसिद्ध टी 20 लीग आहे. आयपीएल 2026 ची सुरुवात 28 मार्च पासून झाली होती. मंगळवार 7 एप्रिल पर्यंत आयपीएल 2026 मध्ये जवळपास 13 सामने खेळवले गेले आहेत. प्रत्येक सीजनपूर्वी आयपीएल 2026 ची सुरुवात ही ऑक्शनने केली जाते. तसेच रिटेन केलेल्या खेळाडूंना यंदा त्यांचा संघ किती पैसे देणार हे जाहीर करते. आयपीएल ऑक्शन आणि रिटेन्शनंतर आयपीएल कर्णधारांच्या पगाराशी संबंधित यंदा बरीच तफावत दिसून येतेय. यात एक क्रिकेटर हा आयपीएलच्या 19 व्या सीजनमधीलच नाही तर संपूर्ण आयपीएल इतिहासातील सर्वात स्वस्त कर्णधार ठरला आहे.
आयपीएल 2026 मध्ये यंदा प्रथमच सर्व 10 संघांचे कर्णधार हे भारतीय क्रिकेटर आहेत. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आहे तर लखनऊ सुपर जाएंट्सचा कर्णधार ऋषभ पंत, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग, चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार ईशान किशन, पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आहे.
लखनऊ सुपर जाएंट्सचं नेतृत्व करणारा ऋषभ पंत हा आयपीएल 2026 मधील सर्वात महागडा कर्णधार आहे. एवढंच नाही तर पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू सुद्धा आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने 27 कोटींना त्याला आयपीएल 2025 च्या ऑक्शनमध्ये विकत घेतलं होतं. यंदाही त्याच किंमतीवर त्याला रिटेन करण्यात आलं आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे हा आयपीएल 2026 मधील सर्वात स्वस्त कर्णधार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या सिजनसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 1.50 कोटी रुपयांना रहाणेला रिटेन केलं. तसेच केकेआर संघाचं नेतृत्व करण्याची संधी देखील दिली. अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल २०२५ च्या ऑक्शनपूर्वी रिलीज केलं होतं. तेव्हा केकेआरने ऑक्शनमधून 1.50 कोटी रुपयांना त्याला विकत घेतलं. अजिंक्य रहाणे हा आयपीएलचाय इतिहासातील सुद्धा सर्वात स्वस्त कर्णधार आहे.
लखनऊ सुपर जाएंट्स : ऋषभ पंत : 27.00 कोटी
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर : 26.75 कोटी
चेन्नई सुपरकिंग्स : ऋतुराज गायकवाड : 18.00 कोटी
गुजरात टायटन्स : शुभमन गिल : 16.50 कोटी
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेल : 16.50 कोटी
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या : 16.35 कोटी
राजस्थान रॉयल्स : रियान पराग : 14.00 कोटी
सनराइजर्स हैदराबाद : ईशान किशन : 11.25 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार : 11.00 कोटी
कोलकाता नाइटराइडर्स : अजिंक्य रहाणे : 1.50 कोटी
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
LSG
(20 ov) 164/8
|
VS |
GT
165/3(18.4 ov)
|
| Gujarat Titans beat Lucknow Super Giants by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.