Hardik Pandya and Mahieka Sharma: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नताशा स्टॅन्कोविकपासून वेगळं झाल्यानंतर हार्दिकचं नाव सतत नव्या मुलींसोबत जोडले जात आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात तो एका रहस्यमय मुलीसोबत दिसत आहे. फॅन्सनी तिला लगेचच हार्दिकची नवी गर्लफ्रेंड म्हणून ओळख दिली. ही मुलगी म्हणजे अभिनेत्री आणि फिटनेस मॉडेल माहिका शर्मा (Mahieka Sharma) आहे.
व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एअरपोर्टवर एकत्र दिसत आहेत. दोघंही एकमेकांशी खूप कम्फर्टेबल वाटत असल्याचं फॅन्सना जाणवलं, आणि लगेच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की हीच हार्दिकची नवी लेडी लव्ह आहे का?
माहिका शर्मा दिल्लीची रहिवासी असून तिचं वय केवळ 24 वर्षं आहे. ती एक एक्ट्रेस, मॉडेल आणि फिटनेस इन्फ्लुएंसर आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. माहिकाने दिल्लीमधून इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. आपल्या कॉन्फिडंट पर्सनॅलिटीमुळे ती एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत चांगली ओळख निर्माण करत आहे.
माहिका शर्मा प्रसिद्ध रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. तसेच ती ऑस्कर-विजेत्या Into the Dusk या डॉक्युमेंट्री फिल्मचा भाग राहिली आहे. त्याशिवाय माहिकाने विवेक ओबेरॉयसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी या बायोपिकमध्येही काम केलं होतं, ज्यामुळे तिला मोठा ब्रेक मिळाला.
मॉडेलिंग आणि फिटनेस इंडस्ट्रीमध्ये माहिका चांगली कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती सुमारे 3.20 कोटी रुपये आहे. तिच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते.
हे ही वाचा: BCCI अध्यक्ष मिथुन मन्हासला डेट करते वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती? Viral Photo मुळे खळबळ!
हार्दिकसोबत माहिकाच्या या पहिल्या पब्लिक उपस्थितीनंतर फॅन्स दोघांच्या रिलेशनशिपबद्दल अंदाज बांधत आहेत. जरी दोघांकडून कोणतंही अधिकृत विधान आलं नसले, तरी सोशल मीडियावर त्यांचं नाव सध्या प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More
LIVE|
UAE
239/9(50 ov)
|
VS |
NEP
154/3(36.1 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.