Who is Vighnesh Puthur MI Debutant IPL 2025: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) हा बहुचर्चित सामान रविवारी खेळवला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 24 वर्षीय विघ्नेश पुथूरवर विश्वास ठेवत संघात स्थान दिले. रोहित शर्माच्या जागी प्रभावशाली खेळाडू म्हणून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. संघाने विश्वास ठेवलेल्या या खेळाडूने त्यांना विश्वासघात न करता दमदार खेळ केला. डावखुरा मनगटाचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने चेन्नईच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. पहिल्याच सामन्यात तीन विकेट्स घेणारा हा खेळाडू आहे तरी कोण? असा प्रश्न सगळ्यांचं पडला आहे. चला जाणून घेऊयात कोण आहे विघ्नेश पुथूर?
मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरने आयपीएल पदार्पणातच सर्वांनाच प्रभावित केले. त्याने तीन षटकांत तीन विकेट्स घेतल्या. पुथूरने 4 षटकांत 32 धावा देत तीन बळी घेतले. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा यांची विकेट विघ्नेश पुथूरने घेतली.
हे ही वाचा: 45 चेंडू, 6 षटकार... SRH च्या पहिल्याच सामन्यात ईशान किशनची शानदार खेळी, ठोकले ऐतिहासिक शतक
Twin strikes from the young Vignesh Puthur sparks a comeback for #MI
Updates https://t.co/QlMj4G7kV0#TATAIPL | #CSKvMI | @mipaltan pic.twitter.com/DKh2r1mmOx
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
हे ही वाचा: IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये पंचांना किती पगार मिळतो? एका सिजनची कमाई ऐकून बसेल धक्का!
२४ वर्षीय विघ्नेश पुथूर हा मूळचा केरळमधील मलप्पुरमचा रहिवासी आहे. विघ्नेश पुथूरचे वडील सुनील कुमार हे ऑटो चालक आहेत आणि आई केपी बिंदू या गृहिणी आहेत. विघ्नेश पुथूरला मुंबई इंडियन्सने यंदाच्या सिजनमध्ये 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले. आर्थिक चणचण असतानाही विघ्नेश पुथूरच्या पालकांनी त्याला यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याच्या थोड्या अपरंपरागत गोलंदाजीच्या ऍक्शनमुळे तो क्रमवारीत वर आला आणि केरळ क्रिकेट लीगच्या उद्घाटन सिजनमध्ये तो अलेप्पी रिपल्स संघाचा भाग होता.
विघ्नेश पुथूर या युवा खेळाडूने अद्याप केरळकडून वरिष्ठ स्तरावर एकही खेळ खेळलेला नाही, पण तो अंडर-14 आणि अंडर-19 स्तरावर खेळला आहे. तो सध्या केरळ क्रिकेट लीगमध्ये अलेप्पी रिपल्सकडून खेळतो. देशांतर्गत खेळण्याचाही त्याला अनुभव नाही.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
ITA
(20 ov) 207/4
|
VS |
SCO
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SCO
(20 ov) 207/4
|
VS |
ITA
134(16.4 ov)
|
| Scotland beat Italy by 73 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.