Who is Vaibhav Suryavanshi, RR vs LSG: आयपीएल 2025 च्या 36 व्या सामन्यात वैभव सूर्यवंशी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले. शनिवारी झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 14 वर्षीय खेळाडूने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरला षटकार मारला. शनिवारी झालेल्या जगातील सर्वात मोठ्या T२० लीगमध्ये अर्थात आयपीएलमध्ये बिहारच्या वैभव सूर्यवंशीने ही कामगिरी केली. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली.
नियमित कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीनंतर, वैभव सूर्यवंशीला 14 वर्षे आणि 23 दिवसांच्या वयात सलामीची संधी मिळाली. त्याला इम्पॅक्ट सबस्टिट्यूट म्हणून आणण्यात आले. वैभवने दोन्ही हातांनी ही संधी साधली. तो 20 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत 2 चौकार आणि 3 षटकार मारले. एडन मार्क्रमच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याला यष्टीचीत केले. मेगा लिलावादरम्यान, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले होते.
हे ही वाचा: कोण आहे अनाया बांगर? लिंग बदलानंतर भारतीय खेळाडूंबद्दल धक्कादायक खुलासा करणारी क्रिकेटपटू
27 मार्च 2011 रोजी बिहारमध्ये जन्मलेला वैभव हा या वर्षीच्या आयपीएलमध्ये भाग घेणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने जानेवारी 2024 मध्ये बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच्या या पदार्पणाच्या वेळी तो फक्त 12 वर्षे आणि दिवसांचा होता. त्याच्या पदार्पणात, वैभवने 2024-25 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्ध 42 चेंडूत 71 धावा केल्या. वैभव लिस्ट-ए मध्ये अर्धशतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनला.
हे ही वाचा: लिंग बदल करून आर्यनची झाली अनाया..., पण पीरियड्स येतात का? संजय बांगरच्या लेकीने स्वतःच दिले उत्तर
Welcome to #TATAIPL, Vaibhav Suryavanshi
Updates https://t.co/02MS6ICvQl#RRvLSG | @rajasthanroyals pic.twitter.com/MizhfSax4q
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
हे ही वाचा: 4 सामन्यात 49 विकेट्स... क्रिकेट इतिहासातील सर्वात भयानक रेकॉर्ड, कोण आहे हा खेळाडू? जाणून घ्या
बिहारमधील समस्तीपूर येथील रहिवासी वैभव सूर्यवंशीला वयाच्या अवघ्या ४ व्या वर्षी क्रिकेटचे वेड लागले. त्याचे वडील संजीव यांनी त्याची क्रिकेटची आवड पाहिली आणि घराच्या मागे एक छोटे मैदान करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ९ व्या वर्षी त्याला समस्तीपूर येथील क्रिकेट अकादमीत दाखलही केले. त्यानंतर वैभवने मागे कधीच वळून पाहिले नाही. त्याने चांगल्या वरिष्ठ गोलंदाजांच्या चेंडूलाही धुतले.