IND vs AUS: भारत Vs ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या टी-20 सामना पावसामुळं रद्द होणार?

IND vs AUS 5th T20 Match: भारत vs ऑस्ट्रेलियाच्या  पाचव्या T20 सीरिज शेवटचा सामना आज ( 8 नोव्हेंबर 2025)  ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळवला जाणार आहे. पण या सामन्याविषयी चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. या सामन्याला पावसाचं ग्रहण लागू शकते. जाणून घ्या, हवामानाचा अंदाज काय आहे?  

Updated: Nov 8, 2025, 11:08 AM IST
IND vs AUS: भारत Vs ऑस्ट्रेलियाच्या पाचव्या टी-20 सामना पावसामुळं रद्द होणार?

IND vs AUS 5th T20 Match: भारत सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर, भारत पाच सामन्यांची मालिका जिंकेल. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 सामन्यात प्रभावी विजय मिळवले.

Add Zee News as a Preferred Source

ब्रिस्बेन हवामान स्थिती
हवामान वेबसाइट अ‍ॅक्यूवेदरनुसार, शनिवारी ( 8 नोव्हेंबर 2025) दिवसभर ब्रिस्बेन ढगाळ राहील. दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, किमान तापमान 21 अंश असू शकते. दुपारी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे आणि संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5:45 ( भातानुसार 1 वाजून 45 मिनीट) वाजता टॉस होईल आणि सामना संध्याकाळी 6:15 वाजता सुरू होईल, परंतु या वेळी पावसाचा अंदाज चिंताजनक आहे.   

हे पाहा पावसाचे वेळापत्रक

संध्याकाळी 5 वाजता: पावसाची शक्यता 47 टक्के
संध्याकाळी 6:  ढगाळ वातावरण
संध्याकाळी 7-8: पावसाची 49टक्के शक्यता
रात्री 9-10: शक्यता 60 टक्क्यांपर्यंत वाढते.
रात्री 11: 49 टक्के पावसाची शक्यता

हे ही वाचा: "हजारो जीव गमावण्यास ते जबाबदार..." सुरेश रैना, शिखर धवनवर पोलीस आयुक्तांचा संताप; जाणून घ्या प्रकरण

याचा अर्थ असा की संध्याकाळ होताच रिमझिम आणि मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. गाबा ची ड्रेनेज सिस्टीम बरीच चांगली आहे, परंतु सतत पाऊस पडत राहिल्यास सामना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर भारत 2-1 असा मालिका जिंकेल.

भारतासमोर मोठे आव्हान
भारतीय संघाला हा फायनल सामना पूर्ण करायचा असेल आणि मालिका विजयाने संपवायची असेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियालाही हा सामना टाय करायचा असेल कारण जर भारतनाते सामना जिकंला सीरीज भारताच्य नावावर होईल. टी 20 सामन्याचा महानिकाल आता आजच्या ब्रिस्बेनमधील हवामानावर अवलंबून असेल.

FAQ

1. ब्रिस्बेनमध्ये पावसाची शक्यता किती?
संध्याकाळी ५ वा.: ४७%, ७-८ वा.: ४९%, ९-१० वा.: ६०%, ११ वा.: ४९%. मुसळधार पाऊस शक्य.

2. सामना कधी सुरू होईल?
टॉस संध्या. ५:४५ (IST १:४५), सामना ६:१५ (IST २:१५) स्थानिक वेळेनुसार.

3. भारतासमोर मुख्य आव्हान काय?
उत्तर: सामना पूर्ण करून मालिका ३-१ ने जिंकणे; ऑस्ट्रेलिया मालिका २-२ ने बरोबरीत आणण्यासाठी खेळेल.

About the Author