IND VS SL T20 Series : भारत विरुद्ध श्रीलंका (India VS Sri Lanka) यांच्यात पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जाणार असून यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. बीसीसीआयने (BCCI) या सीरिजसाठी महिला संघ जाहीर केला असून 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत ही सीरिज सुरु राहणार आहे. यासाठी श्रीलंकेचा महिला संघ हा भारतात येणार आहे.
टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. 23 नोव्हेंबर रोजी तिचं लग्न बॉयफ्रेंड पलाश मुच्छल सोबत होणार होतं. पलाश आणि स्मृती मागील 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मात्र लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यांचं लग्न लांबणीवर पडलं. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी रविवारी दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचं लग्न मोडल्याची माहिती दिली. दरम्यान पलाशने स्मृतीला चीट केल्याने हे लग्न मोडल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली, मात्र दोघांनीही लग्न मोडल्याचं कारण सांगितलं नाही. स्मृती मंधाना ही मागील बरेच दिवस मानसिक त्रासातून गेली, त्यानंतर ती श्रीलंके विरुद्ध टी 20 मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. उपकर्णधार म्हणून तिचा बीसीसीआयकडून संघात समावेश करण्यात आलेला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना : 21 डिसेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा सामना : 23 डिसेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा सामना : 26 डिसेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका चौथा सामना : 28 डिसेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा सामना : 30 डिसेंबर
हेही वाचा : IPL 2026 Auction : 16 डिसेंबरला होणार IPL 2026 चं ऑक्शन, 77 जागांसाठी तब्बल 350 खेळाडूंमध्ये स्पर्धा
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, रिचा घोष (विकेटकिपर), जी कमलिनी (विकेटकिपर), एस चारी शर्मा, एस.
भारत–श्रीलंका महिला टी20 सीरिज कधी खेळवली जाणार आहे?
ही पाच सामन्यांची टी20 मालिका 21 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे.
स्मृती मंधाना खेळणार आहे का?
हो, स्मृती मंधाना ही उपकर्णधार म्हणून संघात समाविष्ट असून ती मालिकेत खेळणार आहे.
भारतीय संघाची कर्णधार कोण आहे?
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.