टॉसवेळी टीम इंडियासोबत झाली चीटिंग? सोशल मीडियावर Video व्हायरल, नेमकं काय घडलं?

IND VS PAK : रविवार 5 ऑक्टोबर रोजी कोलंबोच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महिला वर्ल्ड कप 2025 चा सामना खेळवला जात आहे. मात्र या सामन्याच्या टॉस दरम्यान टीम इंडियाची फसवणूक झाल्याचा आरोप चाहत्यांकडून केला जात आहे.   

पूजा पवार | Updated: Oct 5, 2025, 07:51 PM IST
टॉसवेळी टीम इंडियासोबत झाली चीटिंग? सोशल मीडियावर Video व्हायरल, नेमकं काय घडलं?
(Photo Credit : Social Media)

IND VS PAK : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात रविवारी महिला वर्ल्ड कप 2025 चा (Womens World Cup 2025) सामना खेळवला जात आहे. कोलंबोच्या मैदानात हा सामना खेळवला जात असून  भारत - पाकमध्ये ताणलेल्या संबंधांनंतर खेळवण्यात आलेल्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात झाली आणि या सामन्याचा टॉस पाकिस्तानने जिंकला. मात्र या टॉस दरम्यान भारतीय संघाची फसवणूक करण्यात आली असं काही फॅन्सचं म्हणणं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आर. प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे टीम इंडिया महिला वर्ल्ड कप 2025 मधील दुसरा सामना पाकिस्तान विरुद्ध खेळतेय.  सामन्यापूर्वी झालेला टॉस पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने जिंकला. तिने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, ज्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचं आव्हान मिळालं. मात्र टॉस दरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत असून टीम इंडियाची फसवणूक करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

नेमकं काय घडलं?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आणि भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर टॉससाठी उभे होते. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस उडवला आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा 'टेल' म्हटल्याचे ऐकू येते, परंतु मॅच रेफरीने टेलऐवजी हेड्स म्हटले. टॉस खाली पडला आणि ते हेड्स आले. त्यामुळे मॅच रेफरीने पाकिस्तानी कर्णधाराला तिने टॉस जिंकल्याचा संकेत दिला. आता प्रश्न असा उपस्थित होतो की जेव्हा कॉल ऑफ टेल दिला गेला तर हेड्सवर टॉस कसा जिंकला. 

भारत - पाकमध्ये नो हॅन्डशेक : 

नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या आशिया कप 2025 स्पर्धेत भारत - पाकिस्तानच्या संघात तीन सामने खेळवण्यात आले. मात्र यापैकी एकाही सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानच्या खेळाडूंसह हात मिळवला नाही. टॉस दरम्यान सुद्धा सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधारशी हात मिळवला नव्हता. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने घेतलेली ही भूमिका भारताच्या महिला संघाने सुद्धा पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप सामन्यातही घेतली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस झाल्यावर पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवणं टाळलं. एवढंच नाही तर हरमनप्रीतने  पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना सोबत नजर सुद्धा मिळवली नाही. 

FAQ : 

भारत विरुद्ध पाकिस्तानचा महिला वर्ल्ड कप सामना कधी आणि कुठे खेळवला जात आहे?
उत्तर: हा सामना रविवार, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुपारी ३ वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे.

टॉस दरम्यान काय वाद निर्माण झाला?
उत्तर: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणे उडवलं, फातिमा सनाने 'टेल्स' म्हटलं, पण मॅच रेफरी शँड्रे फ्रिट्झने 'हेड्स' ऐकलं आणि नाणं हेड्स आलं. यामुळे पाकिस्तानला टॉस जिंकल्याचा संकेत देण्यात आला, ज्यामुळे भारतीय चाहत्यांनी फसवणुकीचा आरोप केला आहे.

भारताने नो हॅन्डशेक धोरण का कायम ठेवलं?
उत्तर: पुरुषांच्या आशिया कप २०२५ मधील तीन सामन्यांमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंसह हात मिळवला नव्हता. या धोरणाचं पालन महिला वर्ल्ड कप सामन्यातही करण्यात आलं. टॉसदरम्यान हरमनप्रीत कौरने फातिमा सनाशी हात मिळवला नाही आणि नजरही मिळवली नाही.

About the Author