Womens World Cup 2026 : वर्ल्ड कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, 'या' संघाने बळकावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?

Womens World Cup 2026 Points Table :  बुधवार 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 मधील सामना हा पावसामुळे रद्द झाला. ज्यामुळे पॉईंट्स टेबलवर मोठा परिणाम झालेला दिसून देतोय. 

पूजा पवार | Updated: Oct 16, 2025, 05:29 PM IST
Womens World Cup 2026 : वर्ल्ड कपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल, 'या' संघाने बळकावलं नंबर 1 चं स्थान, भारत कितव्या स्थानी?
(Photo Credit : Social Media)

Womens World Cup 2026 Points Table :  आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 चे (Womens World Cup 2025) सामने भारत आणि कोलंबोमध्ये खेळवला जातोय. आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 16 सामने खेळवले झाले असून यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत. आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये बुधवार 15 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला गेला. पण या सामन्याचा कोणताही निकाल लागला नाही कारण कोलंबोमध्ये संनयदरम्यान पाऊस पडला आणि त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 पॉईंट्स देण्यात आले. पण या सामन्यानंतर वर्ल्ड कप पॉईंट्स टेबलमध्ये दोन संघाचं खूप नुकसान झालं. 

Add Zee News as a Preferred Source

कोणाला झालं मोठं नुकसान?

महिला वर्ल्ड कप 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडचा संघ हा 7 पॉईंट्सने टॉपवर पोहोचलं आहे. ऑस्ट्रेलियाचे सुद्धा 7 पॉईंट्स आहेत मात्र नेट रन रेटने इंग्लंड हा ऑस्ट्रेलियाच्या पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाच्या स्थानात घसरण होऊन ते नंबर २ वर पोहोचलेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया नंबर १ वर कायम होती. इंग्लंडच्या महिला संघाला नेट रन रेट हा +1.864 आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाचा नेट रन रेट +1.353 आहे. साऊथ आफ्रिका 6 पॉईंट्सने तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघ हा 4 पॉईंट्सने चौथ्या नंबरवर आहे. वर्ल्ड कपमध्ये सामील झालेल्या सर्व 8 संघांनी प्रत्येकी 4 - 4 सामने खेळले आहेत. 

इंग्लंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तान जिंकली असती तर त्यांनी वर्ल्ड कप 2025 मधील त्यांचा पहिला सामना जिंकला असता. पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. इंग्लंडच्या संघाने आधी फलंदाजी करताना 31 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 133 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ६ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 34 धावा केल्या. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द करण्यात आला. जर पाकिस्तानने अशीच फलंदाजी सुरू ठेवली असती तर त्यांना या वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळाला असता. पण सामना रद्द झाला तरी पाकिस्तानला पहिला गुण मिळाला आहे.

पाकिस्तान वर्ल्ड कपच्या बाहेर : 

पाकिस्तानने महिला वर्ल्ड कप 2025 मधील एकूण 7 सामन्यांपैकी 4 सामने खेळले आहेत. यातील त्यांना अद्याप एकही सामना जिंकण्यात यश आलेलं नाही. इंग्लंड विरुद्ध सामना रद्द झाल्यावर पाकिस्तानला 1 पॉईंट मिळाला आहे. पाकिस्तानला जर आता टॉप 4 च्या रेसमध्ये राहायचं असेल तर पुढील तीन सामने त्यांना काहीही करून जिंकावे लागतील. पाकिस्तानचे पुढील तीन सामने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्या विरुद्ध असतील. 

आयसीसी महिला वर्ल्ड कप पॉईंट्स टेबल : 

इंग्लंड :  7 पॉईंट्स (NRR +1.864)
ऑस्ट्रेलिया :  7 पॉईंट्स (NRR +1.353)
साउथ अफ्रीका :  6 पॉईंट्स (NRR -0.618)
भारत :  4 पॉईंट्स (NRR +0.682)
न्यूजीलैंड :  3 पॉईंट्स (NRR -0.245)
बांगलादेश :  2 पॉईंट्स (NRR -0.263)
श्रीलंका :  2 पॉईंट्स (NRR -1.526)
पाकिस्तान :  1 पॉईंट्स (NRR -1.887)

FAQ : 

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यामुळे कोणाला मोठं नुकसान झालं?
या सामन्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान दोघांनाही नुकसान झालं. इंग्लंड ७ पॉईंट्ससह टॉपवर पोहोचली, तर ऑस्ट्रेलिया नेट रन रेटमुळे दुसऱ्या स्थानावर घसरली. पाकिस्तानला हा पहिला पॉईंट मिळाला, पण विजय मिळाला असता तर त्यांना पहिला यश मिळालं असतं.

आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५ चे सामने कोठे खेळवले जात आहेत?
या स्पर्धेचे सामने भारत आणि कोलंबोमध्ये खेळवले जात आहेत. आतापर्यंत एकूण १६ सामने खेळवले गेले आहेत.

१५ ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत काय झालं?
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोलंबोमध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजी निवडली होती. इंग्लंडने ३१ ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १३३ धावा केल्या, तर पाकिस्तानने ६ ओव्हरमध्ये १ विकेट नसताना ३४ धावा केल्या. दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ पॉईंट मिळाला.

About the Author